scorecardresearch

“आमचा मोर्चा फडणवीस साईज होता” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्र्यांचा टोला; म्हणाले, “काहींना माझ्या शरीराचं…”

आमचा हा मोर्चा नॅनो नसून फडणवीसांच्या साईजचा होता, असं उद्वव ठाकरे म्हणाले होते.

“आमचा मोर्चा फडणवीस साईज होता” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्र्यांचा टोला; म्हणाले, “काहींना माझ्या शरीराचं…”
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

राज्यपाल भगरसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात महाविकास आघाडीकडून काही दिवसांपूर्वी महामोर्चा काढण्यात आला होता. यावर टीका करताना देवेंद्र फडणवीसांनी हा मोर्चा नॅनो असल्याचे म्हटले होते. तर हा आमचा हा मोर्चा नॅनो नसून फडणवीसांच्या साईजचा होता, असं प्रत्युत्तर उद्वव ठाकरेंनी दिलं होते. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या विधानावरून देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

हेही वाचा – “मी तुम्हाला सांगतो, तुम्ही घाबरू नका, उरलेले आमदार…”, अजित पवारांची शिंदे-फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना देंवेंद्र फडणवीस विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तरं देत होते. त्यांच्या बाजुला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बसले होते. यावेळी सभागृहातील सदस्यांनी मुख्यमंत्री सभागृहाबाहेर गेले का? असं विचारातच ते माझ्या बाजुला आहेत. मात्र, माझ्या शरीरामुळे ते दिसत नाहीत, असं मिश्लिक उत्तर फडणवीसांनी दिलं. तसेच काही लोकांना माझ्या शरीराबद्दल आकर्षण असून ते त्यांच्या भाषणातही माझ्या शरीराचा उल्लेख करतात, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. यावेळी सभागृगहात हशा पिकल्याचं बघायला मिळालं.

हेही वाचा – “महिलांना मंत्रीमंडळात स्थान द्या” म्हणणाऱ्या अजित पवारांना फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, “येत्या मंत्रीमंडळ विस्तारात आम्ही…”

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काढण्यात आलेल्या मोर्चाचे वर्णन फडणवीसांनी ‘नॅनो’ मोर्चा असं केलं होतं. त्याला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं होतं. “माझं म्हणणं आहे की आमचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीस साईज होता.” असं ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 20:26 IST

संबंधित बातम्या