देवेंद्र गावंडे यांना मारपकवार पुरस्कार

पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि मारपकवार परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा २०१५ चा दिवं. दलितमित्र ‘चिंतामणराव मारपकवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार’ लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचे ब्युरो चीफ देवेंद्र गावंडे यांना जाहीर करण्यात आला आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. १५ डिसेंबरला सायं. ५.४५ वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Devendra gavande win award

ताज्या बातम्या