Actor Dharmendra Passes Away : माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात. २०१७ मध्ये शेतकरी आत्महत्येवर संतप्त भावना व्यक्त करतांना बच्चू कडू यांनी अभिनेत्री हेमामालिनीबाबत वाईट शब्द उच्चारले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान हेमामालिनी खूद्द त्यावर संतापल्या होत्या. त्यांनी एका मुलाखतीत अभिनेते धर्मेंद्र हे बच्चू कडूंच्या वक्तव्यावर संतापून एक शिक्षा देणार होते? याबाबत माहिती दिली होती. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.
विदर्भातील मोठे शेतकरी नेते म्हणून बच्चू कडू यांची ख्याती आहे. शेतकरी आत्महत्येवर सरकार आणि सत्ताधारी पक्षांना ते नेहमीच धारेवर धरत असतात. २०१७ दरम्यान शेतकरी आत्महत्येवर ते संतप्त भावना व्यक्त करत होते. यावेळी काहींची आत्महत्या मद्य प्राशन करून झाल्याचा दावा होत होता.
त्यावर बच्चू कडू यांनी हेमामालिनी रोज मद्य प्राशन करतात, परंतु आत्महत्या करत नसल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून देशभरात वाद निर्माण झाला होता. हेमामानिली यांच्याकडून बच्चू कडूंना न्यायालयात ओढण्याची धमकी दिली गेली होती. तर बऱ्याच अभिनेते व अभिनेत्रींनी बच्चू कडू यांच्याबाबत संताप व्यक्त केला होता.
दरम्यान हेमामालिनी यांनी २०१७ मध्येच एक मुलाखत दिली होती. यावेळी हेमामालिनींनी बच्चू कडूंना कोर्टात खेचणार असल्याचे सांगितले होते. ‘बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यानंतर धर्मेंद्र चांगलेच संतापले होते, ते तर त्यांना मारणार होते’, असे हेमामालिनी त्यावेळी म्हणाल्या होत्या. परंतु त्यानंतर बच्चू कडू यांनी सावरासावर करत चित्रपटांचा संदर्भ दिला होता.
चित्रपटात त्या मद्य प्राशन करत असल्याचे म्हणाल्याचे बच्चू कडू म्हणाले होते. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते. अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने पून्हा या वादाला उजाळाल मिळाला आहे. दरम्यान बच्चू कडूंनी सावरासावर केल्यावर काय? झाले याबाबत फारशी माहिती कुणालाही नसल्याचे चित्रपट सृष्टीतील जाणकार सांगतात.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच़े निधन
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी (२४ नोव्हेंबर) ८९ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती अस्थिर होती आणि त्यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. तिथे त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना आपल्या घरी नेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे कुटुंबीय विलेपार्ले येथील स्मशानभूमीत पोहोचले आहेत. तसंच सेलिब्रिटीही याठिकाणी पोहोचत आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
