बुलढाणा : आजवरच्या ‘संयमी’ राजकीय कारकिर्दीत केवळ नगरसेवक पदाची निवडणूक लढवणाऱ्या धीरज लिंगाडे यांनी आजच्या विजयाने राजकीय चमत्कार घडवला. ‘हॅटट्रिक’च्या उंबरठ्यावर असलेल्या रणजीत पाटील यांचे मनसुबे त्यांनी उद्ध्वस्त केले असून संभाव्य मंत्रिपदाची संधी देखील हुकली असल्याचे मानले जात आहे.

दिग्गज काँग्रेसी नेते व राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माजी मंत्री (दिवंगत) रामभाऊ लिंगाडे यांचे चिरंजीव व राजकीय वारसदार ही धीरज लिंगाडे यांची ओळख. यामुळे पदवीधर झाल्यावर त्यांनी १९९८ मध्ये बुलढाणा नगरपरिषदेची निवडणूक लढवली. नगरसेवक पदापासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तो थेट जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे घेऊन. शांत, सावध व संयमी राजकारणी ही ओळख त्यांनी कायम ठेवली.

jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश
Edwin Montagu
विश्लेषण: एका मिठाईवाल्याच्या विजयाने ब्रिटिश सरकार हादरले; १९२० सालची निवडणूक का ठरली महत्त्वाची?

हेही वाचा >>> MLC Election : तब्बल तीस तासांची प्रतीक्षा अन् धीरज लिंगाडेंच्या विजयाचा जल्लोष! बुलढाण्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी

एकसंघ शिवसेनेत असतानाच त्यांनी पदवीधरच्या निवडणुकीची तयारी चालवली. मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी देखील केली. मात्र, सेनेत बंड झाल्यावर त्यांची राजकीय समीकरणे बिघडतात की काय असे चित्र तयार झाले. मात्र, त्यांचे संयमी व शांतपणा हे गुण यामुळे त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. समोर तिसऱ्यांदा लढणारा माजी मंत्री रणजीत पाटील सारखा दिग्गज नेता असतानाही परिपक्व नेत्यासारखे लढत त्यांनी शांततेत आपला प्रचार केला. मतदानाची टक्केवारी कमी असल्याने ती अडचण ठरते की काय? ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली. मतमोजणीपूर्वी आपला विजय नक्की असा खणखणीत दावा त्यांनी कालच बोलून दाखवला. पहिल्या पसंतीने हुलकावणी दिली तरी त्यांनी बाद फेरीअंती रणजीत पाटील यांना ‘बाद’ केले. बारा वर्षांपूर्वी रणजीत पाटील यांनी बी. टी. देशमुख या दिग्गजाला पराभूत केल्यावर ते ‘जायंट किलर’ ठरले. आज त्यांचा पराभव करून धीरज लिंगाडे नवे ‘जायंट किलर’ ठरले आहे.

हेही वाचा >>> अमरावती पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी, भाजपाला धक्‍का

फडणवीस, बावनकुळेंना धक्का

रणजीत पाटील यांचा पराभव विदर्भात घट्ट पाय रोवलेल्या भाजपसाठी धक्काच आहे. नागपूर पाठोपाठ अमरावती पदवीधरचा गडदेखील भाजपने गमावला आहे. हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्यासह भाजपला हा राजकीय इशारा असल्याचे मानले जात आहे. पेन्शन हा कळीचा मुद्धा असला तरी केवळ याच मुद्यामुळे पाटील आणि भाजपा पराभूत झाली नाही हे तेवढेच खरे!