scorecardresearch

अकोला : मावा खाल्ल्यावर ठसका लागला अन् जीव गेला; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

जिल्ह्यातील पातूर तालुक्यात तुलंगा खुर्द गावात मावा खाल्ल्यावर ठसका लागल्याने एकाचा मृत्यू झाला.

अकोला : मावा खाल्ल्यावर ठसका लागला अन् जीव गेला; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
सचिन अविनाश आठवले

जिल्ह्यातील पातूर तालुक्यात तुलंगा खुर्द गावात मावा खाल्ल्यावर ठसका लागल्याने एकाचा मृत्यू झाला. सचिन अविनाश आठवले (३६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तुलंगा खुर्द गावात सचिन यांनी सुपारी आणि तंबाखूमिश्रित मावा खाल्ल्याने त्यांना ठसका लागला आणि ते खाली कोसळले. त्यांना श्वास घेणे कठीण झाले होते. हा प्रकार बघून ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा >>> राज्यात सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात ; पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्हा पहिल्या स्थानावर

त्यांच्या मृत्यूमुळे उपस्थित सर्वांना मोठा धक्का बसला. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मृतदेह बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. चान्नी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मावामधील सुपारी अन्ननलिकेत फसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या