लोकसत्ता टीम

नागपूर: पावसाळा सुरू होण्यापूर्वी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व तयारी केली जाते. पूर नियंत्रण आणि तत्सम बाबींचे नियोजन केले जाते. त्याची माहिती लोकांपर्यत पोहचवली जाते. यासाठी यंदा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्तपणे चित्ररथ तयार केला.

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
Kolhapur jobs 2024 Jilhadhikari Karyalay hiring
Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा

साथीच्या रोगांपासून कसे संरक्षण करावे, पूर आल्यावर काय करावे, विजेपासून बचाव कसा करायचा याविषयीची माहिती चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष तसेच तहसील कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.