scorecardresearch

अकोला : काँग्रेसमध्ये नाराजी, जिल्हा कार्यकारिणीच्या उपाध्यक्षांचा राजीनामा

काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी जाहीर केल्याच्या २४ तासांच्या आत एका उपाध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Akola Congress
अकोला : काँग्रेसमध्ये नाराजी, जिल्हा कार्यकारिणीच्या उपाध्यक्षांचा राजीनामा (संग्रहित छायाचित्र)

अकोला : काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी जाहीर केल्याच्या २४ तासांच्या आत एका उपाध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय बोडखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे दिला. त्यामुळे काँग्रेस पक्षातील नाराजी कायम असल्याचे दिसून येते.

हेही वाचा – भंडारा : अजित पवारांच्या भाषणादरम्यान ‘प्रहार’चा गोंधळ, ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ‘खुर्च्या खाली करा’ची घोषणा

Nana-Patole
काँग्रेस पक्षात गटबाजी नाही, तर रविंद्र धंगेकर आजारी असल्याने बैठकीला आले नाही : नाना पटोले
Rahul Narvekar Uddhav Thackeray
विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात
A march will be held at the house of Guardian Minister Backward Classes Commission Chairman and local MLAs in chandrapur
पालकमंत्री, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व स्थानिक आमदारांच्या घरावर तिरडी मोर्चा काढणार; ओबीसींच्या बैठकीत आंदोलन निर्णय
resignation of Ravindra Shinde
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांचा राजीनामा एकमताने मंजूर

हेही वाचा – नाना पटोले म्हणतात, “मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ, भारतीय संघ जिंकला असता तर…”

जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणीचा विस्तार गेल्या काही महिन्यांपासून रखडला होता. अखेर प्रदेशाध्यक्षांच्या मंजुरीनंतर जिल्हाध्यक्षांनी विस्तारित कार्यकारिणी जाहीर केली. विस्तारित कार्यकारिणी वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, चिटणीसांसह तब्बल २६६ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून संजय बोडखे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी वैयक्तिक कारण पुढे करून आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सादर केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Displeasure in akola congress vice president of district executive resigns ppd 88 ssb

First published on: 20-11-2023 at 17:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×