वर्धा : लोकाभिमुख अधिकारी असला की तो प्रत्येक उपक्रम अधिकाधिक लोकांना सोबत घेवून यशस्वी करण्याची मानसिकता ठेवतो. येथील जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची अशीच लोकाभिमुख सनदी अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आज त्यांचा जन्मदिन. पण त्याचे घरगुती सोपस्कार बाजूला ठेवत ते आजच्या शासकीय कार्यक्रमाचा आढावा घेत असताना त्यांना सेलूचा कार्यक्रम दिसून आला. केंद्र शासनाच्या उपक्रमात दिव्यांगांना मोफत साहित्य वितरीत करण्यात येते. खासदार रामदास तडस यांनी पुढाकार घेत अधिकाधिक गरजूंना हे साहित्य मिळावे म्हणून विविध ठिकाणी अशी शिबिरे घडवून आणली. आज सेलुत या शिबिराचे आयोजन असल्याने जिल्हाधिकारी तिथे पोहचले.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
इथे पोहचताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. लहान अपंग मुले-मुली पुष्गुच्छ घेवून त्यांच्या स्वागतास तयार होती. सर्वांनी त्यांना एका टेबलजवळ नेत केक दाखविला. आज आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करणार,नाही नका म्हणू. या गोड व आर्जवी विनंतीस ते ना म्हणू शकले नाही. जिल्हाधिकारी कर्डिले यांनी केक कापत पहिला घास बालिकेस भरविला. टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘हॅपी बर्थ डे’चे सुर उमटले. चिमुकल्यांसोबत साजरा झालेला आजचा वाढदिवस कायमचा स्मरणात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे, तहसिलदार महेंद्र इंगळे व अन्य या क्षणाचे साक्षी होते.