scorecardresearch

Premium

चंद्रपूर : रेती कंत्राटदारास मारहाणप्रकरणी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखासह तिघांना अटक आणि जामीन

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, गणेश ठाकूर व मोनित बेले या तिघांची वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे भेट घेत, ‘तुम्ही कमी दरात रेती का टाकता,’ असा प्रश्न केला.

Sandeep Girhe
संदीप गिऱ्हे

चंद्रपूर : कमी दरात रेती का टाकतोस, अशी विचारणा करणाऱ्या कंत्राटदार जितू चावला यास शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, गणेश ठाकूर व मोनित बेले या तिघांनी वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे रविवारी सायंकाळी धक्काबुक्की करून मारहाण केली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तिघांना अटक करून चारचाकी वाहन जप्त केले. न्यायालयाने तिघांचीही जामिनावर सुटका केली आहे.

चावला हे रेतीचा व्यवसाय करतात. त्यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, गणेश ठाकूर व मोनित बेले या तिघांची वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे भेट घेत, ‘तुम्ही कमी दरात रेती का टाकता,’ असा प्रश्न केला. यावरून चौघांमध्ये वाद झाला. गिऱ्हे, ठाकूर, बेले या तिघांनी चावला यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली. त्यानंतर ते निघून गेले. चावला यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. न्यायालयाने तिघांचीही जामिनावर सुटका केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Eknat Shinde Uddhav Thackeray
“या दाढीने काडी केली तर…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “माझ्या नादाला लागू नका, अन्यथा…”
nagpur devendra fadnavis marathi news, devendra fadnavis latest marathi news, devendra fadnavis paradsinga village marathi news,
“आमच्यासाठी प्रत्येक मतदार महत्त्वाचा”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत; म्हणाले, “माझा आजचा मुक्काम पारडसिंगाला…”
Shambhuraj Desai
महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली माहिती
Mahalakshmi Development Plan
कोल्हापुरात महालक्ष्मी विकास आराखड्यावर अजित पवारांच्या भूमिकेवरून संतप्त भावना

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: District head of thackeray group arrested and bailed in case of assault on sand contractor rsj 74 amy

First published on: 12-07-2023 at 19:41 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×