scorecardresearch

अजित पवारांच्या भाषणादरम्यान ‘प्रहार’चा गोंधळ, ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ‘खुर्च्या खाली करा’ची घोषणा

चैतन्य मैदानावर आज दुपारी सुरू झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच अचानक प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मंचापुढे गोंधळ घातला.

Ajit Pawar speech at Bhandara
अजित पवारांच्या भाषणादरम्यान ‘प्रहार’चा गोंधळ, 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात ‘खुर्च्या खाली करा’ची घोषणा (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

भंडारा : येथील चैतन्य मैदानावर आज दुपारी सुरू झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच अचानक प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मंचापुढे गोंधळ घातला. शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास शासन असमर्थ ठरत असल्याने निषेध व्यक्त करीत विनोद वंजारी मंचापुढे आले व ‘खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देण्यास सुरवात केली.

हेही वाचा – प्रवाशांसाठी आनंदवार्ता; अमरावती-पुणे-अमरावती द्विसाप्‍ताहिक‍ विशेष एक्‍स्‍प्रेसला मुदतवाढ

huge employees crowd in pension court of guardian minister mangal prabhat lodha
मुंबई: पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पेन्शन अदालतमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी; ३५० निवृत्त कर्मचाऱ्यांनी मांडली गाऱ्हाणी
Sharad Pawar pimpri chinchwad
पक्षातील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच अजितदादांच्या बालेकिल्यात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत
Chandrashekhar Bawankule (2)
“पत्रकारांनी आपल्याविरोधात बातमी छापू नये, यासाठी…”, भाजपा पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सल्ल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…
obc protestors in chandrapur
चंद्रपूर : ओबीसी आंदोलकांनी काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा, पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जात असताना पोलिसांनी घेतले ताब्यात

हेही वाचा – नागपूर : …तर आशा वर्कर पुन्हा संपावर जाणार! सीआयटीयू म्हणते…

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाची अघोषित आणीबाणी असल्याचा आरोपही भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. एकीकडे सरकार म्हणते की आम्ही लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या दारी येऊन प्रश्न सोडवत आहोत आणि दुसरीकडे सरकारला कोणी प्रश्नच विचारायचे नाही म्हणून अघोषित आणीबाणी लावून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस अटक करत आहेत, असे पवन वंजारी यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकारामुळे पोलीस बंदोबस्त, सुरक्षा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Disturbance by prahar during ajit pawar speech at bhandara ksn 82 ssb

First published on: 20-11-2023 at 16:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×