scorecardresearch

‘दंत’च्या डॉक्टरांना राजीनामा न देण्यासाठी साकडे

राज्यातील तिन्ही शासकीय दंत महाविद्यालयातील शिक्षक विविध मागण्यांसाठी पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे अध्यापन बंद करणाार आहेत.

अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांना निवेदन सादर करताना दंत महाविद्यालयातील शिक्षक.

मुंबईत दुपारी बैठक, नागपुरात शिक्षकांचे निवेदन

नागपूर : राज्यातील तिन्ही शासकीय दंत महाविद्यालयातील शिक्षक विविध मागण्यांसाठी पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे अध्यापन बंद करणाार आहेत. त्यासाठी ते बुधवारी मार्गदर्शकपदाचे राजीनामे देणार असल्याचे लोकसत्ताने पुढे आणताच वैद्यकीय शिक्षण खात्याने या शिक्षकांना साकडे घालत राजिनामे न देण्याची विनंती केली. त्यानंतर मुंबईत दुपारी बैठक झाली. नागपुरात शिक्षकांनी अधिष्ठात्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शिक्षकांनी डॉ. करमळकर समितीच्या शिफारसीनुसार विविध भत्ते देण्याच्या मागणीसाठी ५ जानेवारीपासून पदव्यूत्तर डॉक्टरांना शिकवणे बंद केले आहे.

या विषयावर वैद्यकीय शिक्षण खात्याने अद्याप तोडगा काढला नाही. त्यातच राज्यातील शासकीय दंत महाविद्यालयातील शिक्षकांनीही या आंदोलनात उडी घेत बुधवारपासून मार्गदर्शकपदाचे राजीनामे देत अध्यापन करणे बंद करण्याची घोषणा केली होती. हा प्रकार लोकसत्ताने पुढे आणताच वैद्यकीय शिक्षण खात्याने नागपूरसह राज्यातील सर्व शासकीय दंत महाविद्यालयातील शिक्षकांना साकडे घालत आंदोलन न करण्याची विनंती केली. सोबत दुपारीच उच्चस्तरीय बैठक घेतल्याचेही महाराष्ट्र स्टेट डेंटल टिचर्स असोसिएशनकडून सांगण्यात आले. त्यामुळे बुधवारी शिक्षकांनी नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी केव्हाही राजीनामे देऊ शकत असल्याचा इशारा दिला गेला.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Doctor dentist resign college teachers ysh

ताज्या बातम्या