उपराजधानीतील अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेत (एम्स) गुडघा प्रत्यारोपणासाठी रुग्णांना तब्बल सहा महिन्याची तारीख डॉक्टरांकडून दिली जात आहे. त्यामुळे गुडघ्याच्या वेदनांनी विव्हळनाऱ्यांना प्रचंड मन:स्ताप होत आहे.उपराजधानीतील सर्वाधिक सुविधा असलेल्या शासकीय रुग्णालयात एम्सचे नाव वरच्या क्रमांकावरच आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून इतरही सर्व पक्षातील नेते या रुग्णालयाची वेळोवेळी प्रशंसा करतात. एम्सला हळू- हळू रुग्णांचा प्रतिसाद वाढत असल्याने बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्या दोन हजारावर गेली आहे.

हेही वाचा >>>नागपूर: विदर्भात मुलींसाठी हक्काचे अनुरक्षण गृह नाही; बालगृहात १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींची अडचण

High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
11 thousands Nikshay Mitra adopt 19 thousands tuberculosis patients
११ हजार ‘निक्षय मित्रां’नी १९ हजार क्षयरोग रुग्णांना घेतले दत्तक, दोन वर्षांत ८८ हजार पोषण किट केले उपलब्ध

येथील अस्थिरोग विभागात गुडघा प्रत्यारोपणाचीही सोय आहे. ही शस्त्रक्रिया येथे महात्मा फुले जनआरोग्य योजनेयोजनेतून शक्य आहे. त्यामुळे बीपीएल व मध्यमवर्गीयांवर येथे नि:शुल्क शस्त्रक्रिया होते. दरम्यान गुडघा प्रत्यारोपणासाठी येथे मोठ्या संख्येने नागपूरसह मध्य भारतातीलही रुग्ण धाव घेत आहे. त्यामुळे हळू- हळू येथील या प्रत्यारोपणासाठी इच्छुक रुग्णांची गर्दी वाढली आहे. नुकतेच येथे एक नागपुरातील रुग्ण गेला. त्याला डॉक्टरांनी गुडघा प्रत्यारोपणाची गरज असल्याचे सांगितले. परंतु त्यासाठी तब्बल सहा महिन्यांची तारीख दिली. त्यामुळे येथे तब्बल सहा महिने प्रत्यारोपणासाठी रुग्णांनी मरण यातणा सोसायच्या काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या विषयावर एम्सच्या संचालिका डॉ. विभा दत्ता यांच्याशी भ्रमनध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.