scorecardresearch

Premium

वाशिम: म्हशीने सोन्याची पोथ खाल्ली अन् एकच धांदल उडाली, नंतर मात्र…

म्हशीची सोनोग्राफी करून डॉक्टर बाळासाहेब कौंडिन्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हशीची यशस्वी शस्त्रक्रिया केली व तिच्या पोटातील सोन्याची पोत बाहेर काढली.

doctors remove gold chain from buffalo tummy
डॉक्टर बाळासाहेब कौंडिन्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हशीची यशस्वी शस्त्रक्रिया केली व तिच्या पोटातील सोन्याची पोत बाहेर काढली.

शेतातील हिरव्या शेंगा सोलून टरफले ताटात टाकली. तेव्हाच महिलेच्या गळ्यातील अंदाजे तीन ते साडेतीन तोळ्याची सोन्याची पोथ ताटात तशीच राहिली. हेच टात म्हशी समोर ठेवले. तीने हिरव्या शेंगा सोबत सोन्याची पोथ फस्त केली. मात्र ही बाब लक्षात येताच घरातील सर्वांची एकच धांदल उडाली. आणि त्यांनी जनावरांच्या डॉक्टरांना फोन केला आणि मग सुरू झाली तिच्या पोटातील पोथ काढण्याची प्रक्रिया… मंगरूळपीर तालुक्यातील सार्सी येथील शेतकरी रामहरी भोयर हे शेती करतात. त्यांच्याकडे म्हैस देखील आहे.

हेही वाचा >>> सणासुदीच्या काळात दोन विशेष रेल्वेला मुदतवाढ, उत्तर-पश्चिम भारतात जाण्यासाठी…

minor raped half naked and bleeding viral video
“फाशी द्या किंवा गोळ्या घाला”, उज्जैन बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची मागणी
Gulabrao Patil on Sanjay Raut Khalistan issue
VIDEO: संजय राऊतांनी खलिस्तान आणि पुलवामाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याला गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…
ganesh murti
वर्धा : मोफत माती घेवून स्वतः तयार केलेली गणेश मूर्ती बसवा… पर्यावरणप्रेमी महिलांचा उपक्रम
parents care assets, responsibility children, Section 23 Indian Penal Code
मातापित्यांची मालमत्ता हवी, पण त्यांची जबाबदारी नको?… वृद्ध आई-वडिलांनी हे वाचायलाच हवं!

सध्या शेतात हिरव्या शेंगा आलेल्या आहेत. रात्रीच्या वेळी घरातील महिलांनी हिरव्या शेंगाची टरफले ताटात काढली. आणि रात्री झोपताना गळ्यातील अंदाजे तीन तोळे सोन्याची पोठ ताटात काढून ठेवली. मात्र हेच ताट म्हशी समोर ठेवले. म्हशीने हिरव्या शेंगा सोबत सोन्याची पोथ देखील फस्त केली. तेवढ्यात लक्ष्यात आले की, त्या ताटात सोन्याची पोथ ठेवली होती. हे बघून घरातील सर्वाची एकच धांदल उडाली. त्यांनी तातडीने जवळचे डॉकटर ज्ञानेश्वर इढोळे यांना कळविले. त्यांनी तातडीने वरिष्ठ डॉक्टरांसोबत संपर्क साधला आणि म्हशीला घेऊन वाशीम येथील जनावराच्या रुग्णालयात पोहचले. मेटल डिटेक्शन वरून म्हशीच्या पोटात काहीतरी असल्याची खात्री करण्यात आली त्यानंतर म्हशीची सोनोग्राफी करून डॉक्टर बाळासाहेब कौंडिन्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हशीची यशस्वी शस्त्रक्रिया केली व तिच्या पोटातील सोन्याची पोत बाहेर काढली. हे बघून घरातील मंडळी व डॉक्टरांनी सुटकेचा नीश्वास सोडला.या घटनेची सर्वत्र चर्चा रंगत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Doctors remove gold chain from buffalo stomach pbk 85 zws

First published on: 28-09-2023 at 13:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×