गरिबीतून संघटना उभारावी म्हणजे चळवळ चिरकाल टिकते. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निर्णय हे सामूहिकपणे घेतले जात असून सामूहिक जबाबदारीचेसुद्धा असतात, असे मत डॉ. हमीद दाभोळकर यांनी समितीच्या राज्यव्यापी बैठकीत व्यक्त केले. ‘अंनिस’ची राज्यव्यापी बैठक नुकतीच वानाडोंगरी हिंगणा येथे झाली. या बैठकीला राज्यातील विविध भागात ‘अंनिस’चे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्य कार्यकारिणीच्या विविध विभागाद्वारे घेतलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्यात आला व पुढील सहा महिन्यांचे कार्य, नियोजनावर विस्तृत चर्चा झाली.

हेही वाचा : आयुर्वेदाच्या नावावर समाज माध्यमांवर जीवघेणे सल्ले ; बांगला पान, लसूण, कापूर खा, आजार दूर करा!

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
Marathi board mumbai
मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर, मुंबई महापालिकेचा निर्णय, १ मे पासून अंमलबजावणी

यात प्रामुख्याने बाबा व बुवाबाजी संघर्ष अभियान, झाडफुक, तंत्रमंत्राच्या नावावर गरीब व अज्ञानी लोकांची दिशाभूल व लुबाडणूक करणाऱ्या तथाकथित बाबांचा पर्दाफाश करून पोलिसांच्या हवाली करणे, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी जनजागृती अभियान राबवणे, विविध उपक्रमांद्वारे समाजात व्याप्त अंधश्रद्धांचे चमत्कार सादरीकरणाच्या माध्यमातून निर्मूलन करणे, महिला सहभागाअंतर्गत अधिकाधिक महिलांना अंधश्रद्धा निर्मूलन अभियानाच्या परिघात आणणे, जुन्या रूढी परंपरांना मूठमाती देण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, विधवांच्या सामाजिक समस्या व त्यांना मानाचे स्थान मिळण्यासाठी ग्रा.पं. स्तरावर प्रयत्न करणे, याव्यतिरिक्त मन व मनाचे आजार, युवा सहभाग व समाज माध्यम, प्रशिक्षण व वार्तापत्र विभाग या सर्व विषयावर विस्तृत चर्चा झाली. यावेळी ॲड. मुक्ता दाभोळकर यांनी संघटना बांधणीवर भर देऊन ‘अंनिस’चा कार्यकर्ता कसा असावा, त्याचे सामाजिक वर्तन व स्थान कसे असावे या वर प्रबोधन केले.