वर्धा : केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या वर्धा दौऱ्यात एक हृदयस्पर्शी घटना घडली. नितीन गडकरी यांच्या दानत्वाचे किस्से लपून नाही. आलेल्यास विन्मुख पाठवायचे नाही, असा त्यांचा लौकिक असल्याचे सांगितल्या जाते. मात्र २५ वर्षांपासून राखी बांधणाऱ्या आपल्या सुप्रसिद्ध बहिणीने ओवाळत राखी बांधली तेव्हा गडकरीकडे खिशात छदाम पण नव्हता.
झाले असे की केंद्रीय मंत्री हे वर्ध्यात प्रा. सुरेश देशमुख यांच्या सत्कार सोहळ्यास आले असतांना कार्यक्रम आटोपल्यावर ते त्यांची वाट बघत असलेल्या भगिनीकडे पोहचले. सुप्रसिद्ध समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे व रवी कोल्हे हे गडकरी येणार म्हणून करुणाश्रम येथे येऊन थांबले होते. या ठिकाणी एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन आश्रमचे आशिष गोस्वामी यांनी केले होते. याच ठिकाणी गडकरी यांना स्मिताताई यांनी राखी बांधली.
हेही वाचा…शरद पवारांकडून नितीन गडकरी यांची भरभरून प्रशंसा; म्हणाले…
तेव्हा ओवाळणी देण्यासाठी गडकरी यांनी खिसे चाचपले. पण काहीच पैसे नसल्याचे दिसल्यावर त्यांनी बाजूलाच उभे गिरीश गांधी यांना विचारणा केली. त्यांनी पैसे दिले, तेच गडकरी यांनी ताटात टाकले. तेव्हा स्मिताताई यांचे डोळे पाणावले.
इथेच रक्षाबंधन सण का, यावर बोलतांना ताई म्हणाल्या की दरवर्षी गडकरी यांना नागपुरात राखी बांधते. पण प्रकृतीमुळे आता जाणे शक्य नसल्याने भावाला इथेच राखी बांधली. स्मिताताई व गडकरी शाळेत सोबतच शिकले.
हेही वाचा…पंतप्रधानांच्या बोलण्यात विरोधाभास- शरद पवार
नाते बहीणभावाचे झाल्याने त्या गडकरी यांना नं चुकता दरवर्षी राखी बांधतात. यावेळी इथेच राखी बांधली.या आश्रमासाठी जागा घेतेवेळी पैसे कमी पडले तेव्हा स्मिताताई यांनीच डॉ. विलास डांगरे यांना विनंती करीत मदत मिळवून दिली होती. तसेच करूणाश्रम हे नावं पण स्मिताईंनीच ठेवल्याची आठवण गोस्वामी यांनी सांगितली.
हेही वाचा…Video: हक्काच्या घरासाठी वाघाचे ‘चिपको’ आंदोलन…व्हिडीओ एकदा बघाच…
गडकरी म्हणाले की याठिकाणी मुक्या प्राण्यांच्या भावना समजून होत असलेले कार्य अमोल आहे. काम करणाऱ्यांना आपला सलाम. यावेळी त्यांनी मोबाईलद्वारे पीपल्स फॉर ऍनिमल्स संघटनेच्या मेनका गांधी यांच्याशी संवाद साधत करूणाश्रमच्या कार्याची प्रशंसा केली. संस्थेला त्यांनी ५ लक्ष रुपयाची मदत घोषित केली. कौस्तुभ गावंडे यांनी त्यांना कार्याची माहिती दिली. बोर व्याघ्र प्रकल्पचे ठेंगडी, पशू चिकित्सक डॉ. संदीप जोगे, ईथे सहकार्य देणारे पगडाल यांचा गडकरी यांनी सत्कार केला. तसेच गोपूजन करीत निरोप घेतला.