scorecardresearch

नागपुरातील नवजात बाळ विक्री प्रकरणात मोठं वळण; डीएनए चाचणी करण्याचा निर्णय

नवजात बाळाचे आई-वडिल निघाले नागपुरातील प्रेमीयुगुल; बाळांची विक्री करणारी टोळीही सहभागी

तेलंगणामधील प्राध्यापक दाम्पत्याला नवजात बाळाची विक्री केल्याच्या प्रकरणात नवीन वळण आले आहे. त्या नवजात बाळाचे आईवडिल नागपुरातील प्रेमी युगुल असून प्रेयसी लग्नापूर्वीच गर्भवती झाल्याने बाळाची विक्री केल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेने आता नवजात बाळाच्या आईला अटक केल्यानंतर बाळाच्या बापालाही शोधले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नागपुरातील एका २२ वर्षाच्या तरूणीशी एका युवकाशी मैत्री होती. मैत्रीनंतर दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही कुटुंबीयाच्या लपून भेटायला लागले. त्यातच ती तरूणी गर्भवती झाली. तिला पाच महिन्यांचा गर्भ राहिल्यानंतर तिच्या प्रियकराने गर्भपात करण्यासाठी डॉक्टरचा शोध घेतला. यादरम्यान त्या तरूणीची नरेश राऊत याच्याशी ओळख झाली. त्याने नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीचा प्रमुख डॉ. विलास भोयर याच्याशी भेट करून दिली. डॉ. भोयरने प्रेमी युगुलाला ३ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी जन्म होताच बाळाला देण्याचे ठरले.

प्रेमी युगुलाला गर्भपात करून सुटका करून घ्यायची होती, परंतु बाळाला जन्म देऊन ३ लाख कमावण्याची संधी मिळाली. त्यामुळे दोघांनीही बाळाला जन्म देताच डॉ. भोयरकडे बाळ सोपवून पुण्याला पळ काढला. डॉ. भोयरने तेलंगणाच्या प्राध्यपक दाम्पत्याला १० लाख रुपयांमध्ये विक्री केली. या प्रकरणात गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त पंडित आणि तपास अधिकारी रेखा संकपाळ यांनी रात्रंदिवस मेहनत या टोळीचा भंडाफोड केला. नवजात बाळाचे पितृत्व सिद्ध करण्यासाठी पोलीस बाळाची डीएनए चाचणी करणार आहे, अशी माहिती आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dramatic turn in nagpur child sold case sgy

ताज्या बातम्या