नागपूर : बाजारात शेतमाल विकल्यानंतर मौजमस्ती करण्यासाठी गंगाजमुनात गेलेल्या एका मौद्याच्या शेतकऱ्याला दोन वारांगणा आणि एक दलालाने मारहाण करुन लुटले. त्याच्या खिशातील पैसे, अंगठी आणि सोनसाखळी हिसकावून घेतली. या प्रकरणी तिघांविरुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला असून दलालासह वारांगणेला अटक करण्यात आली आहे. रवी (४०) रा. नंदनवन आणि अफसाना (३०) रा. गंगाजमुना असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर बरखा ही फरार झाली. 

हेही वाचा >>> तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
two youth beaten badly in pub
पबमध्ये नृत्य करणाऱ्या तरूणीला धक्का लागला अन् राडा झाला…  
Nagpur, IPS, wife,
नागपूर : आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीची छेड काढणे पडले महागात
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Prajwal Revanna Rape Victime
“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा
Kiran Mane on Ujjwal Nikam
“दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा हा भामटा…”, किरण मानेंची उज्ज्वल निकम यांच्यावर टीकात्मक पोस्ट
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”

फिर्यादी मेधश्याम (५२) रा. मौदा हा शेतकरी असून १४ एप्रिलला शेतमाल विक्रीसाठी नागपुरात कारने आला होता. शेतीतील माल विक्री केल्यानंतर तो गंगा जमुनात मौजमजा करायला गेला. त्याच वेळी त्याचा मेहुण्याचा मित्र आरोपी रवी तेथे भेटला. रवी हा दलाल असून वारंगणा अफसाना आणि बरखा यांच्या सोबत त्याची मैत्री आहे. रवीच्या माध्यमातून मेधश्याम अफसानाच्या खोलीत गेला. त्या खोलीत बरखा (३०) आधीपासूनच होती. तासाभरानंतर तेथे रवीसुद्धा आला. बरखा,अफसाना आणि रवी यांनी मेधश्यामला पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास पोलिसात बलात्कार केल्याची तक्रार देण्याची भीती दाखवली. त्यानंतर वारांगणांनी त्याचे कपडे ताब्यात घेतले आणि गळ्यातील १५ ग्रॅमची सोनसाखळी काढून घेतली. त्याच्या खिशातून कारची चावी हिसकली आणि कारमध्ये ठेवलेली सोन्याची अंगठी आणि १८ हजार रुपये रोख असा एकूण ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकला. त्याला ठार मारण्याची धमकी दिली. भयभीत झालेल्या मेधश्यामने कारची चावी मागितली आणि जीव मुठीत घेऊन घरी परतला. त्याने एक आठवड्यानंतर एका पोलीस कर्मचारी मित्राला ही घटना सांगितली. त्यांनी ठाणेदार वैभव जाधव यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. मेधश्यामने लेखी तक्रार दिली आणि ठाणेदाराच्या आदेशाने गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. ठार मारण्याची धमकी आणि लुटल्याचा गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी आरोपी रवी आणि वारांगणा अफसाना या दोघांनाही अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने २६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. बरखा हिचा शोध पोलीस घेत आहेत.