लोकसत्ता टीम

वर्धा: बुधवारी रात्रीपासून ते आज सकाळपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावल्याने वाहतूक ठप्प पडली आहे. वर्धा तालुक्यातील धामणगाव झाडगाव रस्ता, आमला धामणगाव , वरूड म्हसळा, रोठा नगठाणा रस्ता पुलावरून पाणी वाहू लागल्याने बंद पडला आहे.

देवळी तालुक्यातील कोल्हापूर भिडी ,शिरपूर मार्ग प्रभावित झाले आहे. पवनार ते सेवाग्राम ते वरूड मार्ग बंद करण्यात आला आहे. यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. गंगापूर गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला. नंदोरी वासी मार्ग विस्कळीत झाला आहे. हिंगणघाट ते चिंचोली रस्ता पुराने खचला. चाळीस महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची आकडेवारी आहे.