scorecardresearch

Earthquake Breaking: चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील काही भागांसह तेलंगणा राज्यात भूकंपाचे धक्के; ३.१ रिष्टर स्केल तीव्रता

भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती. जमिनीच्या ५ किमी आत हे धक्के बसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

Earthquake tremors in Telangana state including parts of Chandrapur
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

रवींद्र जुनारकर

चंद्रपूर : जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे. तेलंगणा राज्यातही काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती. जमिनीच्या ५ किमी आत हे धक्के बसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

गोदावरी फॉल्ट परिसर हा भूकंपप्रवण भाग असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवार, २१ मार्च रोजी सकाळी ८.४२ वाजता तेलंगणा राज्यातील कागझनगरजवळील दहेगाव भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव येथेही भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती अभ्यासकांनी दिली. यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गोडा यांना विचारणा केली असता जिल्हा प्रशासनाकडे अजून तशी माहिती नाही. माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 14:25 IST

संबंधित बातम्या