दंतरोग तज्ज्ञांचे करोना काळातील निरीक्षण

महेश बोकडे

Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

नागपूर : करोनामुळे शाळाबंदी, बाहेर जाण्यावर, खेळण्यावर आलेले निर्बंध त्यामुळे जास्तीत जास्त वेळ घरातच घालवणाऱ्या मुलांमध्ये या काळात ‘फास्ट फूड’ प्रमाण वाढले आहे. ते दातांमध्ये अडकून राहात असल्याने  दात व हिरडय़ांचे आजार वाढले असल्याचे निरीक्षण शासकीय दंत महाविद्यालयातील दंतरोग तज्ज्ञ व इंडियन डेंटल असोसिएशनने (आयडीए)  नोंदवले आहे. दोन वर्षांपासून सुरू असलेली महामारी, त्यामुळे लावण्यात आलेले निर्बंध याचे परिणाम वेगवेगळय़ा क्षेत्रावर झालेले दिसून आले आहे. यातून शाळकरी मुलेही सुटले नाहीत. एकीकडे करोनाचे भय आणि दुसरीकडे निर्बंधांमुळे शाळा बंद असल्याने झालेली घरकोंडी यामुळे मुले दुहेरी संकटात सापडले आहेत. ऑनलाईन शाळांमुळे डोळय़ावर परिणाम होत असल्याचे निरीक्षण नेत्रतज्ज्ञांनी यापूर्वीच नोंदवले आहे. आता बहुतांश काळ घरातच घालवणाऱ्या मुलांकडून ऑनलाईन ‘फास्ट फूड’, ‘जंकफूड’ मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. हे पदार्थ खाणाऱ्या मुलांमध्ये दात, हिरडय़ांशी संबंधित आजाराचे प्रमाण करोनापूर्व काळाच्या तुलनेत वाढल्याचे दावा दंतरोग तज्ज्ञांनी केला आहे. ही बाब लक्षात घेऊनच  शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय व इंडियन डेंटल असोसिएशनने पालकांना मुलांच्या आहाराकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

अपघाताने दात तुटणे कमी झाले

खेळताना पडल्याने दात तुटणे, हिरडय़ांना इजा होणे, ओठ फाटल्याने उपचारासाठी शासकीय दंत महाविद्यालयांत येणाऱ्या मुलांची संख्या अधिक होती. करोना र्निबधामुळे मुलांच्या मैदानी खेळांवर मर्यादा आल्याने हे प्रमाणही कमी झाले आहे.

दंतरोग तज्ज्ञ काय म्हणतात?

दात किडण्याचे प्रमाण वाढले

शासकीय दंत रुग्णालयात दाताला कीड लागलेले, हिरडय़ांचा त्रास यासह तत्सम आजाराने ग्रस्त मुले जास्त येत आहेत. त्यांच्यावर येथे योग्य उपचाराची सोय आहे.

– डॉ. रितेश कळसकर, विभागप्रमुख, बाल दंतरोगशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय,

उपचारासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा प्रयोग

शासकीय दंत रुग्णालय प्रशासनाने मुलांवरील उपचारासाठी बाल दंतरोग शास्त्र विभागातील काही डॉक्टरांचे व्हॉ ट्सअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून दिले असून त्याद्वारे ठरवून दिलेल्या वेळेत उपचारासंबंधी सल्ला दिला जातो.

– डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,

करोना भयापोटी उपचाराकडे दुर्लक्ष

दंत किंवा हिरडय़ांवर उपचार करण्यासाठी चिकित्सकांना रुग्णांच्या तोंडात बोट टाकावे लागते. त्यातून संक्रमणाचा धोका असतो. परिणामी, पालक मुलांना किंवा ते स्वत: उपचार घेण्यास टाळतात. त्रास वाढल्यावरच चिकित्सकांकडे येतात, असे आढळून आले आहे. नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात करोनाकाळापूर्वी सरासरी ४५० रुग्ण येत होते व यात १ ते १४ वयोगटातील १०० मुलांचा समावेश होता. आता २५० रुग्ण येतात व त्यात २० ते २५ मुले असतात. पूर्वी दाताला किंचित कीड लागली तरी उपचारासाठी धाव घेततली जात होती. परंतु आता कीड लागण्याचे प्रमाण व हिरडय़ांच्या त्रासातही वाढ झालेली दिसून येते, असे शासकीय दंत रुग्णालयातील तज्ज्ञांचे तसेच इंडियन डेंटल असोसिएशनचे मत आहे.

वेळोवेळी ब्रश करा

मुलांचे फास्ट फूड, जंक फूडसह चॉकलेट खाण्याचे प्रमाण वाढले. ते दातांना चिटकतात व त्यातून कीड लागते. हे टाळण्यासाठी मुलांनी वेळत ब्रश करावा.

– डॉ. वैभव कारेमोरे, अध्यक्ष, इंडियन डेंटल असोसिएशन, नागपूर शाखा.