ED raids on betel nut traders in Nagpur Excitement in Central India Nagpur news ysh 95 | Loksatta

नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीचे छापे; मध्य भारतात खळबळ

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) पथकाने नागपुरातील ईतवारी आणि मस्कासाथमधील चार सुपारी व्यापाऱ्यांवर गुरुवारी छापे  घातले व दस्तावेज ताब्यात घेतले.

नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीचे छापे; मध्य भारतात खळबळ
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

नागपूर : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) पथकाने नागपुरातील ईतवारी आणि मस्कासाथमधील चार सुपारी व्यापाऱ्यांवर गुरुवारी छापे  घातले व दस्तावेज ताब्यात घेतले. या कारवाईम महाराष्ट्रासह मध्य भारतातील सुपारी व्यापाऱ्यांमध्ये  खळबळ उडाली आहे.दरम्यान कारवाईमुळे नागपुरातील काही सुपारी व्यापाऱ्यांनी शहराबाहेर पळ काढला, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा >>> नागपूर: फडणवीस, बावनकुळेंच्या जिल्ह्यातील ग्रा.प. निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती

s

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सुपारीकिंग छटवाल याला आसाम पोलिसांनी अटक केल्यानंतर नागपुरातील सुपारी व्यापारी प्रकाश गोयल, आसिफ अल्ताफ कलीवाला, वसीम बावला, दिग्विजय ट्रान्सपोर्टचे संचालक हिमांशु भद्रा यांच्यावर गुरुवारी सकाळीच ईडीने छापे घातले. . सर्व व्यापारी विदेशातून नागपुरात सुपारी आयात करतात. यापूर्वीही ते वेगवेगळ्या चौकशी एजंसीच्या रडारवर आलेले आहे. ईडीच्या पथकात मुंबईसह अन्य शहरातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.  जवळपास ९ तास ईडीचे अधिकारी चौकशी करीत होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 16:33 IST
Next Story
वाघाने केली चक्क वनखात्याची तिजोरी रिकामी…