नागपूरः देशाची राजधानी नवी दिल्ली आणि राज्याची राजधानी मुंबईतून आलेल्या सक्त वसुली संचालनालयाच्या विशेष पथकांनी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील वाळू माफियांवर शुक्रवारपासून छापे घातले. ईडीच्या पथकाने शुक्रवारी पहाटे साडेपाच पासूनच नागपूरसह भोपाळच्या वाळू माफियांवर एकाच वेळी छापेमारी केली.
मध्यप्रदेशातून २०२१ मध्ये नागपुरात महसूल बुडवून तस्करी केली जात होती. तसेच वाळू तस्कर बेहिशोबी पैशाचा व्यवहार करत होते. या संदर्भात सदर पोलीस ठाण्यात गुन्हेसुद्धा दाखल आहेत. पोलिसांनी मध्यप्रदेशातील बड्या तस्कराली अटकही क्ली होती. ईडीने नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी, रामपुरी, खापा आणि सावनेरमध्ये वाळू माफियांच्या निवासस्थानी छापे टाकले. यात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे आणि यांचा भाऊ प्रुल्ल कापसेचाही समावेश होता.
वाळू तस्करी आणि मनी लाँड्रींग प्रकरणात ही छापेमारी झाल्याची माहिती आहे. तसेच सावनेरमध्ये विनोद गुप्ता, लक्ष्मीकांत सातपुते, दादू कोलते, प्रुल्ल कापसे यांच्यावर कारवाई केली. तसेच पाटणसावंगीमध्ये शरद रॅाय आणि मनोज गायकवाडचे घर आणि दुकानावर, खापा येथील अमित रॅाय यांच्या घरावर ही ईडीने कारवाई केली. या कारवाईत वाळू व्यवहारातले महत्वाचे घबाड आणि मोठी रक्कम हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
