scorecardresearch

वर्धा: पाळण्याची दोरी नव्हेतर हाती आता ‘ स्टिअरिंग व्हील ‘; वाहनचालक पदासाठी आता युवतीही सरसावल्या

सर्व प्रकारच्या सरकारी भरतीत शिक्षित मुलींनी आघाडी घेण्याची बाब नवी राहली नाही.

women driver
वाहनचालक पदासाठी आता युवतीही सरसावल्या(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

सर्व प्रकारच्या सरकारी भरतीत शिक्षित मुलींनी आघाडी घेण्याची बाब नवी राहली नाही. मुलींचा टक्का वाढला ही गौरवाची बाब मात्र वाहन चालक पदासाठी लागू होत नव्हती. त्यातही पोलीस विभागात तर या पदासाठी मुली दुर्मिळ असण्याचेच चित्र. ते बदलण्याचा पण मुलींनी घेतल्याचे दृश्य दिसून आले.

हेही वाचा >>>नागपूर: उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरासमोर ठेवला बॉम्ब?पोलीस नियंत्रण कक्षाला आला धमकीचा फोन

जिल्ह्यात पोलीस शिपायांच्या नव्वद व छत्तीस जागा वाहनचालक पदाच्या भरल्या जात आहे. त्यासाठी विविध टप्प्याच्या परीक्षा घेतल्या जात आहे. वाहन चालक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी अकरा मुलींनी हजेरी लावली.हा आकडा पोलिसांच्या दृष्टीने लक्षणीय ठरला. वेळी अवेळी कुठेही जाण्याची आपत्ती असणारी ही जबाबदारी आहे. तसेच अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात असल्याने वारंवार धाडी घालण्यासाठी गाडी हाकावी लागते. पाठलाग करण्याची जोखीम तर नेहमीचीच. मात्र ते सर्व आव्हान स्वीकारण्याची जबाबदारी या सावित्रीच्या लेकींनी पत्करत परीक्षा दिली.आता किती यशस्वी ठरतात,ते निकाल लागल्यानंतर दिसेलच.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 15:14 IST

संबंधित बातम्या