बँकेत असल्याचे सांगत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एका महिलेची आणि तिच्या नातेवाईकांची ४५ लाखांनी फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी आठ जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- पतीसोबत नाच करणाऱ्या तरुणीशी तीन युवकांनी केले अश्लील कृत्य

बँकेत गुंतवणूक करतो म्हणत ४५ लाखांना गंडा

तक्रारदार माया हरिदास शंभरकर (४८, राजगृहनगर) या अपंग असून त्यांचे वडील नुकतेच शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. वडिलांना मिळालेल्या पैशातून त्यांनी गुंतवणूक करण्याचे ठरवले. आरोपी नवनीत कैलाश गजभिये याने त्याची बहीण प्रियदर्शनी कैलाश गजभिये (३८, बँक कॉलनी) यांनी कट रचून माया यांचे पैसे लुबाडण्याचा कट रचला. त्याने माया यांना ‘एचडीएफसी’ बँकेची तोतया व्यवस्थापक प्रियदर्शनी हिच्याकडे पैसे गुंतवल्यास पाच वर्षांत दुप्पट रक्कम होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे माया यांनी स्वतःसह नातेवाईकांचे ४५ लाख रुपये गजभियेकडे गुंतवणूक केली.

हेही वाचा- नोकराने महिलेस दिली अश्लील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी

आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

गजभिये भावंडांनी चैतन्य मौदेकर, हितेश गजभिये, महेश गणवीर आणि अन्य तीन आरोपींसह कट रचून एचडीएफसी बँकेचे बनावट धनादेश, शिक्के तयार करून गुंतवणूक केल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात आरोपींनी पैसे हडप केले होते. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.