नागपूर: विधान परिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक ,शांततामय, वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत मनाई आदेश जारी केले आहे. जिल्ह्यात २ फेब्रुवारी अखेरपर्यंत परवाना प्राप्त अग्नीशस्त्रे व हत्यारे, दारुगोळा स्वत:जवळ बाळगण्यास व सोबत वाहून नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी सहा महिन्याचा काळ, तरीही काम अपूर्ण

Map , Akola district, human chain,
मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Bhavana Gawali
यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?
Liquor Licenses pune
पुण्यात ४ जूनपर्यंत दारूचे नवे परवाने, रिन्युएशन बंद

या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी व कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. परंतु अशा सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँक व संस्थेच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेली आहे.

ज्या व्यक्तींना निवडणूक कालावधीत स्वत:जवळ शस्त्र बाळगण्याची, वाहून नेण्याची आवश्यकता असेल अशा व्यक्तींनी आदेश निर्गमित झाल्यापासून १०दिवसाच्या आत जिल्हाधिकारी  तथा जिल्हादंडाधिकारी यांचे समक्ष विनंती अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे.