नागपूर : उपराजधानीत गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. रात्रभर विज नसल्याने महावितरणच्या नरेंद्र नगर कार्यालयात नागरिकांनी तोडफोड केली. तर इतरही भागात नागरिक संतप्त होते. विजेअभावी अनेक अपार्टमेंटला पाणी संपले, तर काही भागात नागरिकांची मोबाईल बॅटरी डिस्चार्ज झाली.

नागपुरातील रात्रभर वीज नसलेल्या भागात नरेंद्र नगर जवळील श्री नगर, एम्प्रेस मिल सोसायटी, कन्हैया रेसिडेन्सी, व्यंकटेश सिटी, बेसा, मनीष नगर, गांधीबाग, सावरकर नगर, वर्धा रोड, विवेकानंदनगरचा काही भाग, संताजी काॅलनी रामकृष्णनगर, लक्ष्मीनागर आणि इतरही अनेकच भागाचा समावेश होता. दरम्यान, महावितरण कर्मचारी फोन उचलत नसल्याने नरेंद्रनगर भागातील वीज कार्यालयात संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. अजनी कार्यालयातही नागरिक संतप्त झाले होते, पण पोलीस बंदोबस्त वाढवल्याने अनुचित घटना टाळली.

unclean water supply, Thane, Rumors of unclean water,
ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा; पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली

हेही वाचा… धक्कादायक! ‘रिलायन्य मार्ट’मध्ये जळमटे लागलेल्या अन्नधान्याची विक्री

हेही वाचा… चंद्रपूर : ज्युनियर कॉलेज शिक्षकांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली; शिक्षक संघटना पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

वीज कर्मचाऱ्यांना सूचना होताच त्यांनी रात्री अंधारातही झटपट दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यांना कामात वीज यंत्रणेवर वृक्ष पडले असण्यासह इतरही बऱ्याच तांत्रिक अडचणी येत होत्या. दुसरीकडे महावितरणचे सर्व वरिष्ठ अधिकारीही रात्रभर विविध भागात गस्त घेत कामाचा आढावा घेत, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करत होते. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात रात्री पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा महावितरणकडून केला गेला. तर बऱ्याच भागात रात्रीपासून सकाळपर्यंत वीज नसल्याने पाण्याची मशीन नागरिकांना सुरू करता आली नाही. त्यामुने पाणी नसल्याने नागरिकांची दमछाक झाली.