नागपूर : महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून नवनवीन प्रशिक्षण कार्यक्रम राबवून कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगारक्षम बनवण्यावर भर देणार असल्याची माहिती ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.

लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान खवले यांनी ‘महाज्योती’चे विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘महाज्योती’च्या माध्यमातून दर्जेदार प्रशिक्षण देऊन ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांचा नोकऱ्यांमधील टक्का वाढवण्यावर भर आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश केवळ नोकरी आणि व्यवसायासाठीच नसून शालेय विद्यार्थ्यांना नीट, जेईईसारख्या काठीण्य पातळी असलेल्या प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण देण्यावरही आहे. लाभार्थींची संख्या मोठी असल्याने विद्यार्थ्यांना ऑफलाईन प्रशिक्षण देणे तूर्तास शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि त्यासाठी आवश्यक इंटरनेट जोडणी दिली जात आहे. याशिवाय तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून आवश्यक चित्रफीत तयार करून विद्यार्थ्यांना दिली जाते. भविष्यात ऑफलाईन प्रशिक्षणाची योजना आहे. शासकीय नोकऱ्यांमधील वाढती स्पर्धा बघता ‘महाज्योती’ने केंद्र सरकारच्या काही संस्थांशी करार केला असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण दर्जेदार असून यातून १०० टक्के रोजगाराची हमी आहे. यामुळे भविष्यात नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या हाताला रोजगार मिळेल. याशिवाय केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. दिल्ली आणि पुणे येथील नामवंत शिकवणीमधून विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून यशस्वी होणाऱ्यांचा टक्काही चांगला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची आणि काळाची गरज लक्षात घेता भविष्यात नवीन योजना सुरू करण्याचा मानस असून आयजीटीआरचा कौशल्य विकास कार्यक्रमही लवकरच सुरू होणार आहे, असेही खवले यांनी सांगितले.

pune , aicte, vernacular language
तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

हेही वाचा – वर्धा : “निष्ठावंतांना डावलल्याने कर्नाटकात भाजपाचा पराभव, पक्षाने बोध घ्यावा”, आमदार दादाराव केचे यांचा घरचा आहेर

‘महाज्योती’ची स्वतंत्र इमारत

संस्थेची बारा माळ्यांची स्वतंत्र इमारत येत्या काळात उभारण्यात येणार आहे. यासाठी तांत्रिक मान्यता मिळाली असून इमारतीसाठी ८० कोटी १८ लाखांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. येथे विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, राहण्याची सुविधा आणि अन्य सोयी राहणाार असल्याचे खवले यांनी सांगितले.

अग्निवीरसाठीचे प्रशिक्षणही देणार

भारतीय अभियांत्रिकी सेवा भरतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याची योजना आहे. याला अधिक मागणी असून आपल्या विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण मिळाल्यास त्यांचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय अग्निवीर प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच एमपीएससी आणि यूपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही खवले यांनी सांगितले.

हेही वाचा – नागपूर : ‘सुपर’मधील उद्वाहन बंद.. रुग्णांनी जिन्याने जायचे काय?

‘महाज्योती’ स्वत: प्रशिक्षण देणार

प्रशिक्षण संस्थांची निवड ही ई निविदेच्या माध्यमातून केली जाते. मात्र यामुळे संस्थेवर त्याचा मोठा आर्थिक बोझा पडतो. त्यामुळे भविष्यात ‘महाज्योती’ स्वत: प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचा विचार करीत असल्याचेही खवले यांनी सांगितले.