अकोला : आजारी २३ वर्षीय तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी तिरडीवरून घेऊन जात असतांना तरुण चक्क उठून बसल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील विवरा गावात बुधवारी रात्री घडला. या प्रकाराची जोरदार चर्चा आहे. प्रशांत मेसरे (२३) असे त्या तरुणाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पातूर तालुक्यातील विवरा गावात राहणारा प्रशांत होमगार्ड सेवेत आहे. तो गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालयातील डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळी त्याला मृत घोषित केले. नातेवाईक व गावकऱ्यांनी त्याला गावात आणून अंत्यसंस्काराची तयारी केली. रात्री अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन जात असताना प्रशांत अचानक उठून बसला. हा प्रकार पाहून गावकऱ्यांना धक्का बसला. प्रशांतला तेथील एका मंदिरात नेण्यात आले. हे वृत्त वाऱ्यासारखे परिसरात पसरले. त्यामुळे प्रशांतला पाहण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी उसळली होती. यावेळी घटनास्थळावर पोलिसांनी देखील धाव घेतली. प्रशांत मंत्र-तंत्राचा प्रकार करीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे सर्व चकित झाले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Even after the doctors him dead young man sitting up the funeral in akola district tmb 01
First published on: 27-10-2022 at 11:33 IST