जिल्ह्यात २४ तासांत एक करोनाग्रस्ताचा मृत्यू तर २६९ नवीन रुग्णांची भर पडली. सातत्याने येथे रुग्ण वाढत असतानाच आता शासकिय रुग्णालयात (मेडिकल ) अपघात, विषबाधासह इतर कारणांनी दगावलेल्यांमध्येही करोना असल्याचे आढळत आहे. गेल्या महिन्याभरात येथे असे सहा रुग्ण नोंदवले गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२१ जून २०२२ रोजी मेडिकलमध्ये एक ४७ वर्षीय पुरुषाला आणले. पण, तो आधीच दगावला होता. या रुग्णाचे शवविच्छेदन करण्यापूर्वी नियमानुसार ॲन्टिजन चाचणी केली असता त्याला करोना असल्याचे स्पष्ट झाले. १५ जुलैला गडचिरोलीतून २३ वर्षीय प्रसूती झालेली महिला अधिक रक्तस्त्राव झाल्याने आली. तिलाही करोना असल्याचे स्पष्ट झाले. २० जुलैला विश्वकर्मानगर येथून ६५ वर्षीय व्यक्ती दगावलेल्या अवस्थेत आला. त्यालाही करोना असल्याचे स्पष्ट झाले.

यवतमाळहून २२ जुलैला ४७ वर्षीय महिला दगावलेल्या अवस्थेत आली. तिलाही करोना असल्याचे निदान झाले. २२ जुलैलाच पांढुर्णा, मध्यप्रदेशहून एक ३७ वर्षीय पुरुष विषबाधेने दगावलेल्या अवस्थेत आणला गेला. त्यालाही करोना असल्याचे निदान झाले. २३ जुलैला साकोलीहून एक महिला दगावलेल्या अवस्थेत आली. तिलाही करोना असल्याचे पुढे आले. त्यामुळे या आजाराचे समूह संक्रमण झाल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, गुरूवारी दिवसभऱ्यात शहरात गांधीबाग झोनमधील ८१ वर्षीय पुरुषाचा करोनाने मृत्यू झाला

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Even those who die due to accidents and poisoning are infected amy
First published on: 29-07-2022 at 13:34 IST