लोकसत्ता टीम

नागपूर : महायुतीमध्ये जागा वाटप करताना काही ठिकाणी एक पाऊल मागे घ्यावा लागतो. नाशिक मतदार संघातील कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून घेतले असून जो काही निर्णय होईल त्यानुसार सर्वाना काम करावे लागणार आहे. कारण महायुतीसमोर केवळ नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून पाहण्याचे ध्येय ठरले आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी सारखा सरकार दिग्गज उमेदवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. मला खात्री आहे. मागील काही वर्षात जी काही तयारी बूथ पातळीवरपर्यंत आम्ही केली . त्या आधारावर पहिल्या टप्प्यातील सगळ्या जागा आम्ही जिंकू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधून पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध; महाराष्ट्रातील तरुण संशोधकांचे यश

नाशिकचं शिष्यमंडळ भेटले. सहाजिकच आमचा पक्ष तिथे मोठा आहे. शंभर नगरसेवक त्या भागात आहे. बूथपर्यंत रचना आहे. त्यामुळे लढायला मिळाले पाहिजे असे वाटणे स्वाभाविक आहे. निर्णय तिन्ही पक्षांना मिळून एकत्र घ्यावा लागतो आणि तो आम्ही एकत्र बसून घेऊ. जो काही उमेदवार राहील त्यांचा महयुतीमधील सर्व नेते प्रचार करतील.

महादेव जाणकार हे महायुतीत आले आहेत. त्यांची नाराजी होती, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते पुन्हा महायुतीत आले. एक जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकर चर्चा करून त्याबद्दलचा निर्णय घेऊ असेही फडणवीस म्हणाले.