scorecardresearch

Premium

अकोला : रक्षक बनला भक्षक; बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर…

या प्रकरणी पिंजर पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.

ex crpf employee sexually assaulted girl
(संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम

जिल्ह्यातील पिंजर येथे ‘सीआरपीएफ’च्या माजी कर्मचाऱ्याने बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी पिंजर पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.

हेही वाचा >>> माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्याने पती संतापला; सासूसह मेहुण्याची हत्या करून स्वत:ही केली आत्महत्या

woman raped in pune after being given spiked drink
सावकाराकडून दलित महिलेची विवस्त्रावस्थेत धिंड
thackeray group express doubt on disqualification petitions hearing
विधानपरिषदेतील सेना आमदारांविरोधातील याचिका सुनावणीत संदिग्धता; ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा
Sanjay Raut Manoj Jarange Eknath Shinde
“सरकारला मनोज जरांगे पाटलांना संपवायचं आहे, त्यांना…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप
monu manesar arrested
VIDEO: दोन मुस्लीम युवकांच्या हत्येप्रकरणी मोनू मानेसरला अटक, साध्या वेशातील पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एका २२ वर्षीय तरुणीला तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत वारंवार बंदुकीने जिवे मारण्याची धमकी आरोपी सतीश विठ्ठल बुटे हा देत होता. आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे पीडिता ही गेल्या तीन-चार महिन्यांपासून दहशतीखाली होती. आरोपीने पीडितेला तिच्या कुटुंबाला जिवे मारून टाकण्याची सुद्धा धमकी दिली. पीडितेने हा सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. पीडितेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणात रुद्रेश प्रमोद सुखचैन (२४) हा आरोपीला मदत करीत होता. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी सतीश विठ्ठल बुटे, रुद्रेश प्रमोद सुखचैन या दोघांविरुद्ध पिंजर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ex crpf employee sexually assaulted 22 year old girl by threatening her with gun ppd 88 zws

First published on: 25-09-2023 at 17:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×