७५ वर्षांपूर्वी ज्या धर्माध विचाराने महात्मा गांधी यांचा घात केला, तो विचार आजही देशात थैमान घालत आहे. किंबहुना सरकारी संरक्षणात हा विचार अधिक पसरविण्याचे काम सुरू आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार यांनी केला.नागपूर शहर कॉंग्रेसच्यावतीने अहिंसा दिनानिमित्त व्हॅरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळयाला श्रध्दाजंली वाहण्यात आली.
हेही वाचा >>>बुलढाणा: मोताळा नगरपंचायतमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेसचे ८ नगरसेवक शिंदे गटात
यावेळी जागतिक अहिंसादिन आयोजन समितीचे प्रमुख व माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, आमदार ॲड. अभिजीत वंजारी, सोशल मिडिया अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, डाॅ.गजराज हटेवार, उमाकांत अग्निहोत्री, प्रा.दिनेश बानाबाकोडे, संदेश सिंगलकर, गिरीश पांडव, संजय महाकाळकर, माजी नगरसेवक प्रशांत धवड, सेवादल अध्यक्ष प्रविण आगरे, सेवादलाचे प्रमुख रामगोविद खोब्रागडे, महिला काॅग्रेस शहराध्यक्ष नॅश अली, रमन पैगवार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मुत्तेमवार म्हणाले, महात्मा गांधी यांची नाथुराम गोडसे याने हत्या केली. या दुदैवी घटनेला ७५ वर्षे झाली. ज्या धर्माध विचाराने महात्मा गांधी यांचा घात केला. त्या विचाराचा आज सरकारच्या संरक्षणात रोगराई सारखा फैलाव होत आहे.