scorecardresearch

Premium

कंत्राटी नोकर भरतीमुळे युवकांचे शोषण! २.५ लाख रिक्त पदे केव्हा भरणार?

महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परीक्षांसाठी तयारी करत आहेत.

job
कंत्राटी नोकर भरतीमुळे युवकांचे शोषण! २.५ लाख रिक्त पदे केव्हा भरणार? ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

नागपूर : महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परीक्षांसाठी तयारी करत आहेत.सरकार आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला दुसऱ्या समाजाशी झुंजवत ठेवून कुशल व अकुशल नोकऱ्यांचे बाह्यस्रोतामार्फत कंत्राटीकरण करत आहे.

अशा पद्धतीची नोकर भरती ही सुशिक्षित तरुणांचे शोषण करणारी आहे. सरकारने ही कंत्राटी नोकर भरती तात्काळ थांबवावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.लोंढे म्हणाले की, राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. तलाठी पदाच्या भरतीसाठी १४ लाख तरूणांनी अर्ज भरले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना राज्य सरकार जर कंत्राटी पद्धतीने नोकर भरत करत असेल तर हा सुशिक्षित तरुणांवरील अन्याय असून काँग्रेस पक्ष अशा नोकर भरतीचा निषेध करत आहे. या सुशिक्षित तरुणांना वेठबिगार करण्याचे शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे नियोजन आहे का, हे एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री, एक फुल दोन हाफ, यांनी स्पष्ट करावे.

e bus service in sangli city
महापालिकेच्यावतीने ई बससेवा सुरु करणार- आयुक्त पवार
Recruitment government posts
तब्बल १५० सरकारी पदांसाठी भरती, सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्णसंधी
Rainfall in Maharashtra
आत्तापर्यंत महाराष्ट्रातील पावसाची आकडेवारी काय सांगते? कुठल्या विभागात किती पाऊस?
exam
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ परीक्षा होणार ऑफलाईन पद्धतीने

हेही वाचा >>>सावधान! पनीर खाताय, मग ही बातमी नक्कीच वाचा…

हा सर्व प्रकार पाहता सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न पडतो. राज्य सरकारने ‘आऊटसोर्सिंग’ नोकर भरती बंद करावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्ष तरुणांच्या बरोबर रस्त्यावर उतरेल.उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची ही घोर फसवणूक आहे. १५ -२० हजार रुपये देऊन तरुणांची बोळवण करणार व कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा हा प्रकार आहे. सरकारने ही नोकरी भरती तातडीने बंद करुन कालबद्ध आराखडा आखून २.५ लाख रिक्त पदे भरावीत, असे लोंढे म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Exploitation of youth due to state government contract basic recruitment nagpur rbt 74 amy

First published on: 14-09-2023 at 14:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×