Export of 100 quintals of marigold flowers on the occasion of Dussehra nagpur | Loksatta

बुलढाणा : पांगरीचा झेंडू परराज्यात, दसऱ्यानिमित्त १०० क्विंटलची निर्यात!

झेंडूची वाढती मागणी, कमी वेळात होणारे उत्पादन व उत्पन्न पाहता येथील शेतकरी फुलशेतीकडे वळले आहेत.

बुलढाणा : पांगरीचा झेंडू परराज्यात, दसऱ्यानिमित्त १०० क्विंटलची निर्यात!
दसऱ्यानिमित्त झेंडू फूलाची १०० क्विंटलची निर्यात

जिंठा महामार्गावरील पांगरी उबरहंडे या गावात उबरहंडे या आडनावाचे प्राबल्य आहे. यामुळे उबरहंडेचे गाव अशी गावाची जुनी ओळख. अलीकडे गावाला झेंडू फुल उत्पादकांचे गाव, अशी नवीन ओळख येथील प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे निर्माण झाली आहे.

हेही वाचा- वाशिम : शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून ५० ‘एसटी बसेस’ जाणार , प्रवाशांना मात्र मन:स्ताप

येथील फुलांचा दर्जा चांगला असल्याने यंदा दसऱ्यानिमित्त पुणे व मुंबईसह हैदराबादच्या बाजारपेठेत आतापर्यंत सुमारे १०० क्विंटल झेंडू पाठविण्यात आला आहे. झेंडूची वाढती मागणी, कमी वेळात होणारे उत्पादन व उत्पन्न पाहता येथील शेतकरी फुलशेतीकडे वळले आहेत. यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड केली आहे. किरकोळ विक्री न करता थेट मोठ्या व्यापाऱ्यांना झेंडूची विक्री करण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल आहे. यंदा मागणी चांगली असून दरही समाधानकारक मिळाल्याचे माजी सरपंच बाळासाहेब उबरहंडे यांच्यासह परेश उबरहंडे, दिलीप उबरहंडे, अनिल कऱ्हाडे, एकनाथ उबरहंडे, विनायक उबरहंडे, संदीप उबरहंडे यांनी संगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दस-यानिमित आपट्याची पाने वाटण्याची प्रथा वृक्षाच्या मुळावर; ओरबडण्याच्या वृत्तीमुळे वृक्ष प्रजातीची दुर्मिळ श्रेणीकडे वाटचाल

संबंधित बातम्या

नागपुरात साकारला ‘पन्हाळगड’
अमरावती: मुलाच्या प्रतीक्षेत महिलेने घेतला वृद्धाश्रमात अखेरचा श्‍वास
बदल्यांवरून राज्यातील पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खदखद, कारणे कोणती?
काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार धानोरकरांना पुन्हा उमेदवारी देऊ नका, कारण…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
NDTV-Adani Deal: प्रणॉय रॉय, राधिका रॉय प्रवर्तक पदावरुन पायउतार; NDTV ताब्यात घेण्याचा अदानींचा मार्ग सुखकर?
मुंबईमध्ये गोवरचा आणखी एक बळी
२५ पोलीस अधीक्षक-उपायुक्तांच्या बदल्या 
पर्यावरण संवर्धनासाठी छोटीशी कृतीही महत्त्वाची; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव प्रवीण दराडे यांचे मत
लिपिक, टंकलेखक पदांसाठी जानेवारीत जाहिरात