scorecardresearch

Premium

धान नोंदणीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, मुनगंटीवार यांचा पाठपुरावा

खरेदी केंद्रांची मोजकी संख्या, इंटरनेट नेटवर्कची समस्या, अवकाळी पावसाचे वातावरण, यामुळे धान नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Extension of paddy registration
धान नोंदणीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, मुनगंटीवार यांचा पाठपुरावा (image – pixabay/representational image)

चंद्रपूर : खरेदी केंद्रांची मोजकी संख्या, इंटरनेट नेटवर्कची समस्या, अवकाळी पावसाचे वातावरण, यामुळे धान नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

हेही वाचा – सायबर गुन्हेगाराकडून ११ लाखांनी फसवणूक, पाच दिवसांत पती पत्नीचे बँक खाते रिकामे

Bank Holiday in February 2024
Bank Holiday in February 2024 : फेब्रुवारीत बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, किती दिवस बँका राहणार बंद?
Dharavi redevelopment eligible and ineligible slum dwellers house mumbai
धारावी पुनर्विकासात सर्व झोपडीवासीयांचे पुनर्वसन ! पात्र वगळता इतरांना धारावीबाहेर घरे ?
inflation in india
विश्लेषण : भारतातील अन्नधान्य चलनवाढीचे जागतिकीकरण कसे रोखणार? आता कोणते घटक निर्णायक ठरणार?
loksatta editorial 200 company results
अग्रलेख : ताळेबंदांचा तोल!

हेही वाचा – यवतमाळ : नवीन वीज मीटरसाठी ४५ हजारांची लाच! वीज वितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ अडकला

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने धान उत्पादक शेतकरी आहेत. आधारभूत योजनेअंतर्गत नेमण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर नोंदणी करून शेतकरी धानविक्री करतात. या जिल्ह्यांमध्ये केंद्रांची संख्या मोजकी आहे. अनेक दुर्गम गावांमध्ये इंटरनेट नेटवर्कची समस्या आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीचाही तडाखा विदर्भाला बसत आहे. अशात शेतकऱ्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता धान नोंदणीची मुदत वाढविण्यात यावी, असा आग्रह मुनगंटीवार यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली व पत्रही दिले. याची दखल घेत भुजबळ यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. त्यानुसार धान नोंदणीची मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Extension of paddy registration till 31st december follow up by mungantiwar rsj 74 ssb

First published on: 01-12-2023 at 15:34 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×