scorecardresearch

धक्कादायक ! शिक्षण संस्थाचालकाकडे मागितली पंचवीस लाखांची खंडणी; आरोपी तुरुंगातच

एखाद्या बिल्डरला मागावी अशी खंडणी एका संस्थाचालकास मागितल्याची घडामोड आहे.

arrest
(प्रातिनिधिक छायाचित्र)

वर्धा : एखाद्या बिल्डरला मागावी अशी खंडणी एका संस्थाचालकास मागितल्याची घडामोड आहे. येळकेळी येथे नामांकित शाळा संचालित करणाऱ्या दिनेश चांनावार यांना गावातीलच देवानंद बारहाते याने संस्थेत उपसंचालक करण्याची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास विनयभंग व बलात्काराच्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली. यात मध्यस्थ म्हणून मंगेश विठ्ठलराव चोरे याने हस्तक्षेप केला.

हेही वाचा >>>“अमित शाह उपग्रहाद्वारे ईव्हीएम नियंत्रित करतात,” चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, “त्यांनी यासाठी..”

त्याने पंचवीस लाख रुपयांची मागणी चांनावार यांच्याकडे केली. यापैकी तीन लाख रुपये रोख व पंधरा लाख रुपयांचा कोरा धनादेश आरोपी चोरे याच्या नेरी येथील घरी दिल्याचे सावंगी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर चोरे व बाराहाते यांच्या विरोधात विविध गुन्हे दाखल झाले. विशेष म्हणजे, चोरे हा खंडणीच्या अन्य प्रकरणात गजाआड आहे. तसेच अन्य गुन्हे दाखल असल्याने विविध पोलीस ठाणे त्याला ताब्यात घेऊन चौकशी करीत आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर पिळल्या गेलेले अनेक तक्रारी दाखल करीत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 15:07 IST