scorecardresearch

Premium

महानिर्मितीच्या परीक्षेत तोतया उमेदवाराला अटक, पेपरफुटीची तक्रार मात्र नाही

१५ एप्रिल २०२३ पासून आजपावेतो महानिर्मितीकडे उपरोक्त ऑनलाइन परिक्षेबाबत कुठल्याही स्वरूपाच्या पेपरफुटीची तक्रार प्राप्त झालेली नाही.

Fake candidate arrested in Mahanirti exam
सदर परीक्षा आय.बी.पी.एस.या नोंदणीकृत संस्थेद्वारे ऑनलाइन घेण्यात आली होती.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

नागपूर: महानिर्मितीतर्फे १५ एप्रिल २०२३ रोजी “कनिष्ठ सुरक्षा अधिकारी” पदाची परीक्षा घेण्यात आली आणि शारीरिक क्षमता आणि मनोविश्लेषणात्मक क्षमता चाचणी १९ ते २२ जून घेण्यात आली. त्यानंतर पात्र उमेदवारांना कागदपत्रे जमा करण्याकरिता हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र इतर उमेदवारांकडून सत्तावन गणेश मंसाराम या उमेदवाराबाबत आक्षेप/तक्रार नोंदविण्यात आले की, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणने राबविलेल्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत इतर उमेदवारांकरिता तोतया उमेदवार म्हणून सत्तावन गणेश मंसाराम यांच्या विरोधात पवई पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vijay Wadettivars reaction to Ashok Chavan join BJP
चव्हाणांच्या पक्षांतरावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “एक व्यक्ती गेला म्हणजे…”
in danger of Corona covid Task Force says do not do genetic sequencing
करोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कोविड टास्क फोर्स म्हणतेय, जनुकीय क्रमनिर्धारण सरसकट नको!
budget 2024 investors, investors and budget 2024 in marathi
Money Mantra : अर्थसंकल्पातून गुंतवणूकदारांना काय मिळणार ?
standard deduction limit
यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये मानक वजावटीची मर्यादा वाढवली जाणार का? अर्थमंत्र्यांकडून अधिक सवलतीची अपेक्षा

सदर बाब गंभीर स्वरूपाची असल्याने याबाबत महानिर्मितीने पवई पोलीस निरीक्षक यांना ३ ऑक्टोबर २०२३ ला पत्र पाठवून या संदर्भात अधिक माहिती, कागदपत्रे, न्यायालयीन प्रकरण माहिती आणि संबंधित कागदपत्रे पुरविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे जोपर्यंत या संदर्भात संबंधित व्यक्ती विषयक शहानिशा होत नाही तोपर्यंत सत्तावन गणेश मंसाराम यांचा निकाल महानिर्मितीतर्फे राखून ठेवण्यात आला आहे.

आणखी वाचा-‘एसटी’ची पहिली लक्झरी स्लिपर कोच पुण्याकडे रवाना

सदर परीक्षा आय.बी.पी.एस.या नोंदणीकृत संस्थेद्वारे ऑनलाइन घेण्यात आली होती. विशेष म्हणजे, १५ एप्रिल २०२३ पासून आजपावेतो महानिर्मितीकडे उपरोक्त ऑनलाइन परिक्षेबाबत कुठल्याही स्वरूपाच्या पेपरफुटीची तक्रार प्राप्त झालेली नाही.

१७ सप्टेंबरला ऑनलाइन पद्धतीने “कनिष्ठ प्रयोगशाळा रसायनशास्त्रज्ञ” ही परीक्षा घेण्यात आली. या व्यतिरिक्त महानिर्मितीतर्फे एवढ्यात कुठलीही लेखी परीक्षा घेण्यात आलेली नाही. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशना दरम्यान महानिर्मितीच्या तथाकथित पेपरफुटी बाबत कुठलीही तक्रार अथवा भाष्य विधानसभेत करण्यात आलेले नाही असेही महानिर्मितीने स्पष्ट केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fake candidate arrested in mahanirti exam but there is no complaint of paper leak dag 87 mrj

First published on: 08-10-2023 at 10:37 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×