नागपूर: सोन्याचे दर बघता- बघता नवीन विक्रमी उंचीवर पोहचले आहे. रोजच्या दरवाढीनंतर सोन्याच्या दरात नवीन उच्चांक नोंदवला जात आहे. त्यामुळे ग्राहक चिंतेत असतांनाच एक आनंदाची बातमी पुढे येत आहे. तीनच दिवसात सोन्याच्या दर घसरल्याचे पुढे येत आहे. ६ जूनच्या तुलनेत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (९ जून २०२५) सोन्याचे दर घसरल्याचे पुढे आले आहे.
लग्न सराईच्या दिवसात सोन्याचे वाढते दर ग्राहकांची चिंता वाढवत होते. त्यामुळे ग्राहकांकडून दागिने खरेदी दरम्यान आवश्यकतेनुसार खूप कमी वजनाच्या दागिन्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र होते. बघता- बघता सोन्याचे दर विक्रमी उंचीवर गेल्यावर ग्राहकांकडून हे दर कमी कधी होणार? हा प्रश्न सराफा व्यवसायिकांना विचारला जात होता. तर सराफा व्यवसायिकांकडूनही दर आणखी वाढण्याचेच संकेत दिले जात होते. या दरम्यानच सोन्याचे दर तीन दिवसात घसरल्याचे पुढे आले आहे.
नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर ६ जून २०२५ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्राम ९८ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ९१ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६३ हजार ७०० रुपये होते. हे दर तीन दिवसांनी ९ जून २०२५ रोजी प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९६ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८९ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७५ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ६२ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात सोन्याच्या दरात ६ जूनच्या तुलनेत ९ जून २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये १ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटमध्ये १ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटमध्ये १ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटमध्ये १ हजार २०० रुपयांनी घसरल्याचे दिसत आहे.
चांदीच्या दरातही…
नागपुरातील सराफा बाजारात मेकिंग व जीएसटी शुल्क वगळता चांदीचे दर प्रति किलो ६ जून रोजी १ लाख ६ हजार ७०० रुपये होते. हे दर तीन दिवसांनी ९ जून २०२५ रोजी प्रति किलो १ लाख ६ हजार ७०० रुपयेच नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात मात्र कोणताही बदल झाला नसल्याचे दिसत आहे.