नागपूर : १८०० किलो तांदूळ, ५०० किलो बटाटे, ३०० किलो तेल, १०० किलो मिरची, तीनशे किलो मटर, पाचशे किलो बटाटे, पाचशे किलो कांदे आदी साहित्याचा उपयोग करत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी दहा हजार किलो मसाले भात तयार केला.
निमित्त होते आदिवासींचा मेळावा, आदिवासींमधील अनेक समूह आणि जाती ख्रिश्चन तसेच मुस्लीम झालेले आहेत. त्यांना त्यांच्या मूळ जातीनुसार ओबीसी व अनुसूचित जातीच्या सवलती मिळत आहे. त्या बंद करण्यात याव्या यासाठी जनजाती सुरक्षा मंचतर्फे ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी महामेळावा आयोजित करण्यात आला.




हेही वाचा – आहारात भरडधान्याचा समावेश करा, आजार पळवा, पद्मश्री डॉ. खादर वल्ली यांचे मत
हेही वाचा – अकोला: दोन गटात वाद; किरकोळ कारणावरून तुरळक दगडफेक, तणावपूर्ण शांतता
या महामेळावासाठी देशभरातून २५ हजारपेक्षा जास्त आदिवासी येणार आहे. या आदिवासींच्या भोजनाची सोय व्हावी हा उद्दिष्ट ठेवून विष्णू मनोहर यांनी दहा हजार किलोचा मसाले भात तयार केला. मंगळवारी पहाटे तीन वाजता बजाज नगरातील विष्णू जी की रसोई येथे एका मोठ्या कढईमध्ये मसाले भात तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. सकाळी सात वाजता हा मसालेभात तयार करण्यात आला. या मसाले भाताचे सर्व आदिवासी आलेल्या बांधवांना मैत्री परिवारातर्फे वाटप केले जाणार आहे. याआधीही विष्णू मनोहर यांनी पाच हजार किलोचा मसालेभात तयार केला होता. शिवाय २५ हजार किलो चिवडा, ३ टन वांग्याचे भरीत आदी पदार्थ तयार करण्याचेही त्यांनी विक्रम केले आहेत.