scorecardresearch

वाशीम: ‘कुसुम’ योजनेंतर्गत अनुदानित सोलर खरेदीच्या नावावर शेतकऱ्याची पावणेचार लाखांनी फसवणूक; मोबाईलवर बाजारभाव पाहायला गेला अन्…

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकदा नवनवीन क्लुप्त्या, योजनेचे अमीष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे सक्रिय झाले आहेत.

kusum yojna
'कुसुम' योजनेंतर्गत अनुदानित सोलर खरेदीच्या नावावर शेतकऱ्याची पावणेचार लाखांनी फसवणूक

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकदा नवनवीन क्लुप्त्या, योजनेचे अमीष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे सक्रिय झाले आहेत. असाच काहीसा प्रकार वाशीम जिल्हयातील मंगरुळपीर तालुक्यातील नवीन सोनखास येथील शेतकरी संजय बोचे यांच्यासोबत घडला.

हेही वाचा >>>वर्धा: पोलिसांनी अडवली साहित्यप्रेमींची वाट; उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या

मोबाईलवर बाजारभाव पाहत असताना योजनेच्या माध्यमातून सोलार पंप देण्याच्या नावाखाली एका बनावट कंपनीने संजय बोचे यांची ३ लाख ८५ हजार २७४ रुपयाने फसवणुक केली. या प्रकरणी मंगरुळपीर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.संजय बोचे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते मोबाईलवर बाजारभाव पाहत असताना कुसुम योजनेंतर्गत अनुदानावर सोलार देण्याची जाहिरात दिसली. त्या जाहिरातीमधील नमुद संकेतस्थळाला भेट देवून दिलेल्या लींकच्या आधारे पत्नी स्नेहा संजय बोचे यांच्या नावाने अर्ज भरला. त्यामध्ये खाते क्रमांक देत नोंदणी शुल्क व ३ लाख ८२ हजार २७४ रुपयाचा भरना केला. त्यानंतर बोचे यांनी सदर कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही संपर्क न झाल्याने व ओळखीच्या व्यक्तींकडून माहिती घेतली असता, सदर योजना खोटी असून कंपनीची लिंकही बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर झालेल्या फसवणुकीची तक्रार मंगरुळपीर पोलिसात देण्यात आली. या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 12:09 IST
ताज्या बातम्या