यवतमाळ : कोणी मुलगीच देईना म्हणून अनेक गावांत शेतकरी मुलांचे लग्न जुळत नसल्याची ओरड सातत्याने होते. शिवाय मुलीही शेतकरी नवरा नको गं बाई! म्हणत केवळ शेतीवर उपजिविका असलेल्या वरांना नकार देत असल्याचे चित्र समाजात बघायला मिळते. त्यामुळे अनेकजण शेती विकून एखादा व्यवसाय किवा संस्थेत शिपायाची का असेना नोकरी करून, लग्नगाठ बांधण्याचा प्रयत्न करतात.

शेतकरी मुलांना वधू मिळणे दुरापास्त झाले असताना एका वराने ’शेती विकायची नसते तर जपायची असते’, असा मौलिक संदेश देत स्वत: धुरकरी बनत बैलबंडीवरून लग्नाची वरात काढली. नेर येथे बुधवारी घडलेल्या या प्रकाराची सर्वत्र चर्चा असून या नवरदेवाचे कौतुक होत आहे.

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
committee has been formed under chairmanship of sub-divisional officer of Daryapur to investigate after Kirit Somaiyas allegations
किरिट सोमय्यांच्‍या आरोपानंतर खळबळ… अमरावतीत आता बांगलादेशींच्या…
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज

हेही वाचा – बुलढाणा : मोबाईलवर तीनदा तलाक म्हणत दिला घटस्फोट! पोलीस हवालदाराचे विवाहबाह्य संबंध…

शहरातील शिवाजी नगरमधील सुधीर देवीदास खेर असे या शेतकरीपुत्राचे नाव आहे. सुधीर यांचा विवाह बुधवारी पार पडला. विवाहाच्या पूर्वी घोड्यावरून वरात काढून नाचण्याचा प्रकार रूळलेला आहे. मात्र सुधीर यांनी स्वत:च्या लग्नाची वरात आगळ्या वेगळ्या पद्धतीने काढली. सुधीर यांच्याकडे १२ एकर शेती आहे. तीन भाऊ आणि सर्व कुटुंबाची उपजिविकाच शेतीवर अवलंबून आहे.

अलिकडे मुली शेतीवाला मुलगा नापसंत करतात. मुलीचे नातेवाईकही शेतीपेक्षा नोकरीवाल्या मुलास प्राधान्य देतात. त्यामुळे आपल्या वरातीतून शेतीचे महत्व अधोरखित व्हावे, या हेतूने सुधीर यांनी शेतीत राबणाऱ्या बैलांना वरातीत सारथी होण्याचा सन्मान दिला. नवरदेवाच्या पोशाखात स्वत: बैलबंडीचा धुरकरी होवून गावात वाजत गाजत वरात काढली. डीजेच्या तालावर वराती नाचत असताना नेर शहरात ही वरात कौतुकाचा विषय ठरली.

सजवलेल्या बैलबंडीच्या मागे ‘शेती विकायची नसते, जपायची असते’, असा मौलिक संदेश लिहिला. चार दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता असलेली शेती परिश्रम केले तर कधीच उपाशी ठेवत नाही. शेतीत परिश्रमासोबतच नवनवीन प्रयोग केल्यास शेतीतून नोकरीपेक्षाही अधिक आर्थिक उत्पन्न मिळू शकते, असा संदेश सुधीर यांनी या वरातीतून गावकऱ्यांसह वधु-वराकडील वरातींनाही दिला.

हेही वाचा – बांगलादेशातील हिंदू अत्याचारांविरुद्ध महत्त्वाचा निर्णय, आता यापुढे…

उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी यात काळानुरूप बदल होत, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असा क्रम झाला आहे. त्यामुळे शेतीवाला नवरा मुलगा करायला कोणीही धजावत नसल्याचे चित्र समाजात आहे. शेतीचे अर्थचक्र तोट्याचे असले तरी, पारंपरिक पीक पद्धती आणि निसर्गावर विसंबून न राहता, शेतीत पाण्याचे व्यवस्थापन, विविध पीक पद्धती, नवे प्रयोग आणि शेतीपुरक व्यवसाय करून कुटुंबाने संघटित परिश्रम घेतल्यास शेती हा तोट्याचा व्यवसाय नाही, असाच संदेश सुधीर यांनी आपल्या लग्नातून समाजाला दिल्याची प्रतिक्रिया नेर तालुक्यात उमटत आहे.

Story img Loader