यवतमाळ : पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेस फुलं वाहून शेतकरी विधवांची गांधीगिरी | Farmer widows protested by carrying flowers to the image of Prime Minister Modi amy 95 | Loksatta

यवतमाळ : पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेस फुलं वाहून शेतकरी विधवांची गांधीगिरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी पुणे जिल्ह्यातील आळेगाव येथील शेतकरी दशरथ केदारी यांनी आत्महत्या केली.

यवतमाळ : पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेस फुलं वाहून शेतकरी विधवांची गांधीगिरी
पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेस फुलं वाहून शेतकरी विधवांची गांधीगिरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी पुणे जिल्ह्यातील आळेगाव येथील शेतकरी दशरथ केदारी यांनी आत्महत्या केली. आज रविवारी पांढरकवडा येथे केदारी यांच्या श्रद्धांजली सभेत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर पुष्पार्पण करून गांधीगिरी आंदोलन केले.

हेही वाचा >>> चंद्रपूर : घरी न सांगता पोहायला जाण्याचा बेत जीवावर बेतला, इरई नदीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी व या घटनेची दखल घेण्यासाठी शेतकरी नेते व शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या वतीने आज पांढरकवडा येथे श्रद्धांजली सभा आयोजित केली हाती. या सभेत पंतप्रधान मोदी यांच्या नावे ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या करणारे आळे येथील शेतकरी दशरथ केदारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांच्या पुष्पहार घातलेल्या प्रतिमेस उपस्थितांनी पुष्पार्पण केले. यावेळी शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. सरकार, न्यायव्यवस्था, नोकरशाही, लोकप्रतिनिधी यांचा कणा वाकला आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आक्रोश मोर्चा काढणार असल्याची घोषणा यावेळी तिवारी यांनी केली. पंतप्रधान मोदी यांना कार्यक्रमातील महिला पुष्पार्पण करत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर सार्वत्रिक झाली आहे. त्यामुळे तिवारी यांच्या या कृतीविरोधात प्रशासनाकडून काय कारवाई होणार, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. आंदोलनात शेतकरी नेते मोरेश्वर वातीले, प्रेम चव्हाण, अजय राजुरकर, अंकित नैताम यांच्यासह विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या शेतकरी महिला उपस्थित होत्या.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
चंद्रपूर : घरी न सांगता पोहायला जाण्याचा बेत जीवावर बेतला, इरई नदीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू

संबंधित बातम्या

“हे फक्त गडकरीच करू शकतात, तो काँग्रेसचा नेता असूनही…”, नाना पाटेकरांचं नागपुरात वक्तव्य
‘डेंग्यू’च्या रुग्णसंख्येबाबत आरोग्य विभागात गोंधळ!; दोन कार्यालयांची वेगवेगळी आकडेवारी 
Dahi Handi 2022 : नागपूर – जन्माष्टमीच्या सुटीचा ‘सरकारी’ घोळ; शाळांना सुटी तर महाविद्यालये आणि कार्यालय मात्र सुरू
Video – भंडारा : … अन् बैलाने पोळ्याच्या दिवशीच दारुड्या मालकाला घडवली चांगलीच अद्दल; व्हिडीओ प्रचंड व्हायरल
नागपूर : शिक्षक मतदारसंघ निवडणूक, १ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य
“माझ्या लग्नात…” हार्दिक जोशीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर अक्षया देवधरने शेअर केली खास पोस्ट
पुणे: ३६ व्या आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन स्पर्धा; इथिओपियाच्या स्पर्धकांनी मारली बाजी
संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “…तर सरकारला अमित शाहादेखील वाचवू शकणार नाहीत”
“इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे पण…” प्रथमेश परबने केलेली पोस्ट चर्चेत