लोकसत्ता टीम

चंद्रपूर : नातेवाईकाकडील कार्यक्रमासाठी वडील चिमुकल्या मुलाला घेऊन दुचाकीने निघाले. वाटेत काळरूपी मालवाहू वाहन समोर आले. या वाहनाला दुचाकी धडकली अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. अपघातात वडिलांचा घटनास्थळीच, तर चिमुकल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त झाली. यानंतर बापलेकाची एकत्र अंत्ययात्रा निघाली अन् समाजमन सुन्न झाले. ‘खेळ कुणाला दैवाचा कळला?…’ याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आला.

Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
shivsena
तीन विरुद्ध तीन! मुख्यमंत्री म्हणतात, ‘हा’ मतदारसंघ आम्ही लढूच…
congress u turn on evm machines
पहिले विरोध, आता तंत्रज्ञानाचा अभ्यास; इव्हीएमवर असाही यू टर्न
four killed in car truck collision in chandrapur district
चंद्रपूर : भरधाव कारची ट्रकला धडक; भीषण अपघातात चार मित्रांचा मृत्यू
Two people drown Wardha, Independence Day holiday,
वर्धा : स्वातंत्र्यदिनाची सुट्टी बेतली जीवावर; दोन बुडाले, तर एक बचावला…
woman teacher killed after bike hit by a speeding truck at gondia city
गोंदिया: अवैध फलकामुळे अपघात, शिक्षिकेचा जागीच मृत्यू
Thrill between tiger and cobra in Tadoba video goes viral
नागपंचमीच्या दिवशी ताडोबात वाघ आणि कोब्रामध्ये रंगला थरार….

शनिवारी जिल्ह्यातील ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील खरकाडा फाट्यावर उभ्या असललेल्या पीकअप वाहनावर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात वडील उमेश गणपत ठाकरे (३७, रा. खरकाडा) यांचा घटनास्थळीच, तर वैभव उमेश ठाकरे (५) या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

आणखी वाचा-संत गजानन महाराजांची पालखी स्वगृही; शेगावात लाखांवर भाविकांची मांदियाळी

तालुक्यातील खरकाडा येथे ठाकरे कुटुंबीय राहतात. उमेश ठाकरे हे आपल्या मुलासोबत ब्रह्मपुरी येथील नातेवाईकाकडे एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते मुलासह खरकाडा गावाकडे येण्यास दुचाकीने निघाले. ब्रह्मपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील खरकाडा फाट्यावर उभ्या असलेल्या पीकअप वाहनावर उमेश यांची दुचाकी धडकली. उमेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर पुढे बसून असलेला मुलगा वैभव हा गंभीर जखमी झाला. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गावकऱ्यांनाही या घटनेची माहिती मिळाली. पोलीस, गावकरी घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी असलेल्या वैभवला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यानेही जगाचा निरोप घेतला.

बापलेकांचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळताच पंचक्रोशीत शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण, अंकुश आत्राम, राहुल लाखे, विजय मैंद, मुकेश गजबे, संदेश देवगडे, अनुप कवठेकर यांनी घटनास्थळी दाखल नागरिकांची गर्दी पांगवली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

आणखी वाचा- रेल्वेच्या ‘मेगा ब्लॉक’मुळे अनेक गाड्या रद्द

मागील महिन्यात वैभवने वयाची पाच वर्षे पूर्ण केली होती. ठाकरे कुटुंबीयांनी मुलाचा वाढदिवस जोरात साजरा केला. संपूर्ण गावाला गोडजेवण दिले. चिमुकला मुलगा अनेकांचा लाडाचा होता. रविवारी बाप-लेकाची एकत्रच अंत्ययात्रा निघाली. दोघांवरही एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत त्यांना अखेरचा निरोप दिला. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले. दरम्यान, या अपघातानंतर रस्त्यावर थांबलेल्या दुचाकीस्वाराला चारचाकी वाहनाने धडक दिली. यात सोमेश्वर ठाकरे हा जखमी झाला.