लोकसत्ता टीम

नागपूर : करण अपार्टमेंट नवाबपुरा येथे शेंडे कुटुंबीय वास्तव्याला आहे. घरी दत्तात्रय हे त्यांचा मोठा मुलगा प्रणव (३५), लहान मुलगा कुशल ऊर्फ इंगा आणि भावाचा मुलगा चैतन्य ऊर्फ गणू अनिल शेंडे (२३) यांच्यासोबत राहतात.

Sadhguru Isha Foundation Raid News:
जग्गी वासुदेव यांच्या आश्रमाची झडती; मद्रास उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Vile Parle woman entered in house and stole after falsely claiming sent by domestic worker
शाळकरी मुलीकडून लैंगिक अत्याचाराचा बनाव
After bitten by snake man held by police
साप चावल्यावर रुग्णालयात जाताना पोलिसांनी पकडलं; मद्यपानाचा आरोप ठेवून लाच मागितली, रुग्णाचा वाटेतच मृत्यू
person cheated of Rs 8 lakh 32 thousand 648 in koparkhairane
घरबसल्या पैसे कमावण्याच्या आमिषाने ८ लाखांची फसवणूक
Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा
pune police crack murder case of young man in hadapsar area
नशेबाजांकडून तरुणाचा खून; पत्नी, आईला माहिती दिल्याने खून केल्याचे उघड
Chennai Food delivery Boy
Chennai : धक्कादायक! पार्सल देण्यास उशीर झाल्याने महिलेची शिवीगाळ, मन दुखावल्याने फूड डिलीव्हरी बॉयची आत्महत्या

कुशलने शनिवारी दुपारी वडील दत्तात्रय यांना पाय दाबण्यास सांगितले. मात्र, वडिलांनी त्याला नकार दिला. यातूनच चिडलेल्या कुशलला राग आला. त्याने वडिलांना शिवीगाळ करत त्यांना जबर मारहाण केली. दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मारहाणीत जखमी झालेल्या दत्तात्रय यांना मोठा मुलगा प्रणव व चुलतभाऊ चैतन्य यांनी उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

आणखी वाचा-नागपूर : ‘जिसके घर शीशे के होते है…’, संजय राऊत यांना नितीन राऊत यांचा टोला

घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने गोळा केले. यानंतर आरोपी कुशल याला ताब्यात घेतले. याप्रकरणी चुलत भाऊ प्रणव शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी कुशल विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

गुंड प्रवृत्तीच्या मुलाने ६२ वर्षांच्या वडिलांना पाय दाबायला लावले. वडिलांनी नकार दिल्यावर चिडलेल्या मुलाने वडिलांवर थेट जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा यात मृत्यू झाला. कोतवाली ठाण्यांतर्गत ही घटना घडली. दत्तात्रय बाळकृष्ण शेंडे (६२) असे मृत वडिलांचे नाव आहे. तर, कुशल ऊर्फ इंगा दत्तात्रय शेंडे (३३, रा. फ्लॅट नंबर १ करण अपार्टमेंट नवाबपुरा) असे मुलाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.