घराला आग, मुलाला वाचवताना पित्याचा मृत्यू

२५ जानेवारीला रात्री बारा वाजता शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

प्रतिनिधिक छायाचित्र

पेटता दिवा कपडय़ांवर पडल्याने घडला अनर्थ

नागपूर : पेटता दिवा घरातील कपडय़ावर पडल्याने घराला लागलेल्या आगीतून १० वर्षीय मुलाला वाचवण्यात वडिलांना यश आले, परंतु स्वत: गंभीररित्या  भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला.

२५ जानेवारीला रात्री बारा वाजता शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सागर रमेश भट (३७, रा. शांतीनगर) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर भट हा संगणक दुरुस्तीचे काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. मंगळवारी रात्री तो दारू पिऊन घरी आला. त्यामुळे पत्नी दोन मुलींना घेऊन नणंदेच्या घरी निघून गेली. घरी सागर आणि त्याचा रोहन नावाचा दहा वर्षीय मुलगा होता. गेल्या तीन महिन्यांपासून वीजबिल न भरल्यामुळे सागरच्या घरातील वीज कापण्यात आली होती. त्यामुळे घरी रात्री दिवाच्याच प्रकाश राहायचा. मंगळवारी रात्री बारा वाजता पेटता दिवा कपडय़ावर पडल्याने संपूर्ण घराला आग लागली.  ज्वाळांमुळे मुलगा रोहनला जाग आली. त्याने लगेच वडील सागलला उठवले. सागर  आग बघून घाबरला. मुलगा रोहनच्या अंगावर कापड गुंडाळून तो पेटत्या घरातून बाहेर पडला. या प्रयत्नात सागर चांगलाच भाजला गेला. रोहनचा जीव वाचला परंतु, गंभीर जखमी सागरचा मृत्यू झाला.याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Father dies trying to save son from house fire zws

Next Story
अन् अनाथ, मूकबधिर ‘गणेश’च्या नव्या आयुष्याला सुरुवात ; कल्याण मूकबधिर विद्यालयाचा पुढाकार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी