scorecardresearch

लता मंगेशकर यांच्या चित्रपट गीतांची रसिकांना मेजवानी; राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे विशेष कार्यक्रम

दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

lata mangeshkar, lata mangeshkar show, zee marathi,

पुणे : दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार आणि शनिवारी (२५, २६ मार्च) अनुक्रमे ‘माझे बाळ’ या १९४३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे प्रदर्शन आणि ‘कालजयी’ या दृकश्राव्य कार्यक्रमाचे सादरीकरण अशी मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

‘माझे बाळ’ या चित्रपटामध्ये लता मंगेशकर यांनी वयाच्या १३ व्या वर्षी साकारलेली भूमिका पाहण्याची संधी रसिकांना या कार्यक्रमात मिळणार आहे. मास्टर विनायक यांच्या या चित्रपटामध्ये लता मंगेशकर यांची भूमिका आणि आवाज अशी दुहेरी मेजवानी आहे. चित्रपटातील एका गाण्यात मंगेशकर भावंडांना मोठय़ा पडद्यावर पाहता येईल. दामुअण्णा मालवणकर हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

शनिवारी होणाऱ्या ‘कालजयी’ या कार्यक्रमाची दुर्मीळ चित्रफीत ज्येष्ठ रेकॉर्ड संग्राहक आणि सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्सचे सचिव सुरेश चांदवणकर यांच्या संग्रहातील आहे. लता मंगेशकर यांच्या अजरामर मराठी गीतांचे दृकश्राव्य सादरीकरण या कार्यक्रमात असल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी दिली. संग्रहालयाच्या विधी महाविद्यालय रस्त्यावरील सभागृहात होणारा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.

  • शुक्रवार, २५ मार्च – माझे बाळ – संध्याकाळी सहा वाजता
  • शनिवार, २६ मार्च – कालजयी – संध्याकाळी सहा वाजता

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Feast fans lata mangeshkar film songs special event national film museum ysh

ताज्या बातम्या