नागपूर : मसण्याऊद म्हणजे मृतदेह उकरून खाणाऱ्या प्राण्याची जात. त्यामुळे तो स्मशानभूमीच्या आसपास आढळतो. पण अलीकडे तो शहरात कोणत्याही परिसरा दिसायला लागला आहे. अशाच एका मादी मसण्याऊदची प्रसूती चक्क वर्ध्यातील करूणाश्रमात करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा येथील बजाज इंजिनिअरिंग पिपरी महाविद्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावर एक विचित्र प्राणी बसून असल्याची माहिती महाविद्यालय व्यवस्थापनाने करूणाश्रमाचे आशिष गोस्वामी यांना दिली. करूणाश्रमाच्या चमूने घटनास्थळी भेट देऊन तिथे असलेल्या मसण्याऊदला ताब्यात घेतले. मात्र, ही मादी यावेळी प्रसववेदनेत होती तिला त्याच वेळी एक पिल्लू झाले. आमच्या टीमने अतिशय उत्तम प्रकारे तिला बाळासह करूनाश्रमात आणले. वन्यजीव विभाग प्रमुख कौस्तुभ गावंडे यांच्या देखरेखीत ठेवण्यात आले. व्यवस्थापन ऋषिकेश गोडसे करीत आहेत. या गोंडस पिल्लाचे नाव कल्लू ठेवले. मादी आणि पिलाला  पिंजऱ्यात ठेवले थोड्याच वेळात मादीने दुस-या पिल्लाला जन्म दिला. ओळखीसाठी म्हणून त्याचे नाव लल्लू ठेवले. आता तिघे सुरक्षित आहेत. कल्लू, लल्लू, आणि मादी या तिघांनाही काही दिवसात नैसर्गिक अधिवसात सोडण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female delivery puppy animals forest wildlife ysh
First published on: 06-07-2022 at 09:40 IST