scorecardresearch

Premium

चंद्रपूर : क्रिकेट खेळताना हाणामारी; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

क्रिकेट खेळताना मैदानात दोन गटात वाद झाल्याने एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर बॅटने वार केला. या हल्ल्यात फैजन अखिल शेख (१२) हा मुलगा जखमी झाला.

death 22
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

चंद्रपूर : क्रिकेट खेळताना मैदानात दोन गटात वाद झाल्याने एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर बॅटने वार केला. या हल्ल्यात फैजन अखिल शेख (१२) हा मुलगा जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता ५ जून रोजी मृत्यू झाला. बुधवारी अल्पवयीन मृत मुलाचा दफनविधी केलेला मृतदेह बुधवारी शवविच्छेदनासाठी काढण्यात आला. या प्रकरणी एका अल्पवयीन मुला विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शाळाना उन्हाळी सुट्ट्या आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी म्हणून मुले बगड खिडकी परिसरात मैदानावर रोज सकाळ संध्याकाळ क्रिकेट खेळत असतात. ३ जून रोजी क्रिकेट खेळताना दोन गटात हाणामारी झाली. यावेळी एका अल्पवयीन मुलाने फैजन अखिल शेख या मुलाचे डोक्यावर बॅट मारली. यात शेख जखमी झाला. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. ५ जून रोजी त्या जखमी मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या आईने याबाबतची तक्रार केली. त्यानंतर बुधवारी या मुलाचा दफन विधी केलेला मृतदेह बाहेर काढण्यात आलं. शहर पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
farah khan reacts to troll who criticised her
“गणपतीसमोर चपला घालू नकोस…”, ट्रोलरच्या कमेंटला उत्तर देत फराह खान म्हणाली…

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 09:33 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×