scorecardresearch

भंडारा : ‘टी-१३’ वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्तीवर असताना खुर्शीपार तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील तलावात टी-१३ या नर वाघाचा मृतदेह असल्याचे दिसून आले.

Death of tiger Tadoba
(संग्रहित छायाचित्र)

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील नवेगांव-नागझिराच्या कोका वन्यजीव अभयारण्यामध्ये खुर्शीपार तलावाच्या पाणलोट क्षेत्रात आज दुपारी ३.३० वाजता दरम्यान टी-१३ या पट्टेदार वाघाचा मृतदेह गळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्तीवर असताना खुर्शीपार तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील तलावात टी-१३ या नर वाघाचा मृतदेह असल्याचे दिसून आले. तीन दिवसांपासून हा मृतदेह पाण्यात असल्याचा अंदाज आहे.

माहिती मिळताच नवेगांव- नागझिराच्या व्याघ्र प्रकल्पाचे संचालक जयराम गवडा, उपसंचालक पवन जेफ, साकोली वन परिक्षेत्राचे सहाय्यक वन संरक्षक रोशन राठोड ताबडतोब त्यांच्या चमुसह घटनास्थळी पोहोचले. पशू वैद्यकीय अधिकारी देशमुख आणि भडके यांनी शव विच्छेदन केले आहे. वन्यजीव मानद सदस्य नदीम खान, शाहिद खान आणि पर्यावरण संरक्षण संस्थेचे अझहर हुसेन यांनी सांगितले की, या वाघाचे सर्व अवयव साबूत असल्याने घातपाताची शक्यता नाही, मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 19:59 IST

संबंधित बातम्या