scorecardresearch

शहरात वर्षभरात ६५२ आगीच्या घटना; ५४ कोटींपेक्षा अधिकची मालमत्ता वाचवण्यात यश;  अग्निशमन दिन विशेष

शहरातील विविध भागात गेल्या वर्षभरात ६५२ आगीच्या घटना घडल्या असून त्यात  अंदाजे १७ कोटी ६० लाख ९४ हजार ८६० रुपयाचे नुकसान झाले तर ५४ कोटी ६१ लाख, ९६ हजार ७०० रुपयाची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे.

संग्रहित छायाचित्र

नागपूर :  शहरातील विविध भागात गेल्या वर्षभरात ६५२ आगीच्या घटना घडल्या असून त्यात  अंदाजे १७ कोटी ६० लाख ९४ हजार ८६० रुपयाचे नुकसान झाले तर ५४ कोटी ६१ लाख, ९६ हजार ७०० रुपयाची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. १४ एप्रिलला अग्निशमन दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

शहरात वर्षभरात ६५२ आगीच्या घटना  घडल्या. त्यात लहान ३५७ , मध्यम ११६ , व ११० मोठया आगीचा समावेश आहे. आगीच्या घटनांव्यतिरिक्त इतर आपत्कालीन एकूण ५९० घटनांची सूचना विभागास प्राप्त झाली. यामध्ये एकूण ५४ जण जखमी झाले.  ९९ जणांचे जीव गेले.  विभागाने शहराबाहेर एकूण ६३ ठिकाणी आगी विझवल्या. गेल्या वर्षभरात इमारत व व्यवसायासाठी  नाहरकत प्रमाणपत्राद्वारे, अग्निशमन सेवा शुल्क, निरीक्षण शुल्काद्वारे पाणीपुरवठा, विहीर उपसा, तसेच शहराच्या हद्दीबाहेर पुरवण्यात आलेल्या अग्निशमन सेवामार्फत असे एकूण २ कोटी ३३ लाख ३८ हजार २४९ उत्पन्न प्राप्त झाले आहे.

अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

महापालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने उद्या गुरुवारी  सकाळी ९ वाजता अग्निशमन सेवा दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात अग्निशमन कार्य करताना प्राणाची आहुती देणाऱ्या  अधिकारी, कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. महापालिका परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fire incidents city success saving assets fire day ysh

ताज्या बातम्या